<font face="mangal" size="3">विकासात्मक व विनियामक धोरणांवरील निवेदन</font> - आरबीआय - Reserve Bank of India
विकासात्मक व विनियामक धोरणांवरील निवेदन
फेब्रुवारी 8, 2017 विकासात्मक व विनियामक धोरणांवरील निवेदन हे निवेदन, बँकिंगचा रचनात्मक साचा अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रदान व तडजोड प्रणालींची क्षमता वाढविण्यासाठीचे, विकासात्मक व विनियामक धोरण उपाय अधोरेखित करते. (2) नियंत्रण, नजर ठेवणे व जारी करणे हे, वित्तीय क्षेत्रावर नजर ठेवण्याच्या यंत्रणेचे तीन महत्वाचे पैलू आहेत. एक म्हणजे, दूरदर्शीपणा, पारदर्शकता आणि तौलानिकता असण्याची खात्री केली जाईल आणि दुसरे म्हणजे, ग्राहकाचे हितसंबंध जपले जातील असा, वित्तीय संस्था ज्यात काम करतात तो साचा विनियम/नियंत्रण ठरवित असते. सावधपणे नजर ठेवणे ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यात विनियमांच्या अनुपालनावर देखरेख ठेवली जाते. आणि अंमलबजावणीचा संबंध, नजर ठेवण्याच्या प्रक्रियेमधून किंवा अन्यथा, वरील विनियमांचा भंग केल्याच्या आढळून आलेल्या प्रकरणांशी असतो. सध्या, रिझर्व बँकेमध्ये विनियामक व नजर ठेवण्याची कार्ये स्पष्ट असा वेगवेगळेपणा आहे. अंमलबजावणी करण्यासाठी एक सशक्त साचा व प्रक्रिया विकसित करण्यासाठी, एक वेगळे अंमलबजावणी विभाग स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. ह्याबाबत आवश्यक ती पाऊले उचलली जात असून, हा नवीन विभाग एप्रिल 1, 2017 पासून कार्य सुरु करील. (3) माहिती तंत्रज्ञान परिक्षण व सायबर सुरक्षा ह्यावरील तज्ञ पॅनलच्या (अध्यक्षा - श्रीमती मीना हेमचंद्र) शिफारशींवर आधारित, रिझर्व बँकेने, जून 2, 2016 रोजी, सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी बँकांना सायबर सुरक्षिततेसाठीची तयारी करणे अनिवार्य करण्याबाबत बँकांना मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. बँकांनी त्यांची सुरक्षा बळकट करण्यासाठी पाऊले उचलली असली तरीही, अलिकडील सायबर हल्ल्यांची विविधता व हुशारी पाहता, सायबर सुरक्षा क्षेत्राचा व उदयोन्मुख आव्हानांचा आढावा घेणे आवश्यक ठरते. ह्याबाबतीत, पुढील बाबतीत सायबर सुरक्षेवरील एक आंतर-शिस्तबध स्थायी समिती स्थापन केली जात आहे.
जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2127 मुंबई |