<font face="mangal" size="3">सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. कडून कार्यकृ - आरबीआय - Reserve Bank of India
78492532
प्रकाशित तारीख जानेवारी 23, 2017
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. कडून कार्यकृतींचा प्रारंभ जानेवारी 23, 2017
जानेवारी 23, 2017 सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. कडून कार्यकृतींचा प्रारंभ जानेवारी 23, 2017 सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. ह्यांनी, जानेवारी 23, 2017 पासून, एक लघु वित्त बँक म्हणून कार्यकृती करण्यास प्रारंभ केला आहे. बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 22(1) खाली भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला, भारतामध्ये लघु वित्त बँकेचा व्यवसाय करण्यासाठी परवाना दिला आहे. सप्टेंबर 16, 2015 च्या वृत्तपत्र निवेदनात घोषित केल्यानुसार, एक लघु वित्त बँक स्थापन करण्यासाठी तात्विक मंजुरी देण्यात आलेल्या दहा अर्जदारांपैकी, सूर्योदय मायक्रो फायनान्स प्रा. लि., नवी मुंबई, ही एक कंपनी होती. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1973 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?