<font face="mangal" size="3">दि अनंतपुर को.ऑपरेटिव टाऊन बँक लि., अनंतपुरमू, आ - आरबीआय - Reserve Bank of India
दि अनंतपुर को.ऑपरेटिव टाऊन बँक लि., अनंतपुरमू, आंध्रप्रदेश ह्यांना आर्थिक दंड
ऑक्टोबर 12, 2017 दि अनंतपुर को.ऑपरेटिव टाऊन बँक लि., अनंतपुरमू, आंध्रप्रदेश ह्यांना आर्थिक दंड बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 अ (1) (ब) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि अनंतपुर को ऑपरेटिव टाऊन बँक लि., अनंतपुरमू, आंध्रप्रदेश ह्यांना रु.0.50 लाख (रुपये पन्नास हजार) दंड लावला असून, हा दंड, संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना द्यावयाची कर्जे व अग्रिम राशींवरील रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांचे व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यामुळे लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस दिली होती आणि वरील बँकेने त्यावर लेखी उतरही दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य आणि वरील बँकेने दिलेले उत्तर व व्यक्तिगत सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने प्रत्यक्षात झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/ 1019 |