<font face="mangal" size="3">दि बज बज नानगी को-ऑपरेटिव बँक लि., 63 महात्मा गांध - आरबीआय - Reserve Bank of India
दि बज बज नानगी को-ऑपरेटिव बँक लि., 63 महात्मा गांधी रोड, बज बज, दक्षिण 24 परगणा, कोलकाता - 720117 पश्चिम बंगाल ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 16, 2019 दि बज बज नानगी को-ऑपरेटिव बँक लि., 63 महात्मा गांधी रोड, बज बज, दक्षिण 24 परगणा, कोलकाता - 720117 पश्चिम बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, दि बज बज नानगी को-ऑपरेटिव बँक लि., 63 महात्मा गांधी रोड, बज बज, दक्षिण 24 परगणा, कोलकाता - 720117 पश्चिम बंगाल ह्यांचेवर रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लागु केला असून, तो दंड, बी आर अधिनियम 1949 च्या (एएसीएस)) चे कलम 20 आणि, एक्सपोझर नॉर्म्स अँड स्टॅट्युटरी/अदर रिस्ट्रिक्शन्स - अर्बन को-ऑपरेटिव बँक्स ह्यावर जुलै 1, 2015 रोजीचे महापरिपत्रक डीसीबीआर. सीओ.बीपीडी(पीसीबी)क्र.13/13.05.000/2015-16 मधील परिच्छेद 5.1.1 व 5.1.3 मध्ये निर्देशित केलेल्या आरबीआयच्या निर्देशांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन/अन-अनुपालन केले गेल्याने लावण्यात आला आहे. वरील बँकेच्या मार्च 31, 2017 रोजीच्या स्थितीबाबत केलेल्या तपासणीदरम्यान आढळून आलेल्या बाबींच्या आधारावर, भारतीय रिझर्व्ह बँकेने, वरील बँकेला मार्च 25, 2019 रोजी एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर वरील बँकेने तिचे उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व ह्याबाबत नंतर देण्यात आलेले प्रतिसाद विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघनांबाबतचे वरील दावे सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन : 2019-2020/965 |