RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78501970

दि कुप्पम को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., कुप्पम, आंध्रप्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

नोव्हेंबर 27, 2018

दि कुप्पम को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., कुप्पम, आंध्रप्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि कुप्पम को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., कुप्पम, आंध्रप्रदेश ह्यांचेवर रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून, तो दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35अ खाली भारतीय रिझर्व बँकेने दिलेले निर्देश, आणि अनुपालन अहवाल सादर करण्यावरील सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केले गेले असल्याच्या कारणामुळे व वरील अधिनियमाच्या कलम 27(2) खालील अहवाल सादर न करण्यामुळे लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे उत्तरही सादर केले नव्हते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1211

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?