<font face="mangal" size="3px">दि महिला विकास को-ऑपरेटिव बँक लि., अहमदाबाद (गुé - आरबीआय - Reserve Bank of India
दि महिला विकास को-ऑपरेटिव बँक लि., अहमदाबाद (गुजरात) (अनुसूचित नसलेली युसीबी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
मार्च 20, 2019 दि महिला विकास को-ऑपरेटिव बँक लि., अहमदाबाद (गुजरात) (अनुसूचित नसलेली युसीबी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949(सहकारी संस्थांना लागू असणे) च्या कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1) खाली देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि महिला विकास को-ऑपरेटिव बँक लि., अहमदाबाद (गुजरात) (अनुसूचित नसलेली युसीबी) ह्यांचेवर रु.10.00 लाख (रुपये दहा लाख) दंड लागु केला असून, हा दंड, अप्रतिभूतित अग्रिम राशींवरील मर्यादा, संचालक, त्यांचे नातेवाईक व त्यांचे हितसंबंध असलेल्या कंपन्या/संस्था ह्यांना दिलेली कर्जे/अग्रिम राशी, आणि केवायसी/एएमएल ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केले गेले असल्याने लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस (एससीएन) पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते आणि भारतीय रिझर्व बँक अहमदाबाद येथे वरिष्ठ अधिका-यांच्या समितीसमोर वैय्यक्तिक सादरीकरणही केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व वरील बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2249 |