RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78503929

दि मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., मेहसाणा (गुजरात) ह्यांना आर्थिक दंड लागु

मे 14, 2018

दि मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., मेहसाणा (गुजरात) ह्यांना आर्थिक दंड लागु.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47 अ(1)(क) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., मेहसाणा (गुजरात) ह्यांना रु.1.0 कोटी (रुपये एक कोटी) दंड लागु केला आहे. हा दंड, ह्या अधिनियमाखालील नागरी सहकारी बँकांना (युसीबी) दिलेल्या, संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना द्यावयाची अग्रिम राशी, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) नॉर्म्स, ग्रुप एक्सपोझर नॉर्म्स इत्यादींवरील आरबीआयने दिलेले निर्देश/सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणीतील मौखिक सादरीकरणे विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2983

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?