<font face="mangal" size="3">दि पिज पीपल्स को-ऑपरेटिव बँक लि., जिल्हा-खेडा (गì - आरबीआय - Reserve Bank of India
दि पिज पीपल्स को-ऑपरेटिव बँक लि., जिल्हा-खेडा (गुजरात) (नॉन-अनुसूचित युसीबी) - ह्यांना दंड लागु
एप्रिल 20, 2018 दि पिज पीपल्स को-ऑपरेटिव बँक लि., जिल्हा-खेडा (गुजरात) (नॉन-अनुसूचित युसीबी) - ह्यांना दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागू असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि पिज पीपल्स को-ऑपरेटिव बँक लि., जिल्हा-खेडा (गुजरात) (नॉन-अनुसूचित युसीबी) ह्यांना रु.4.00 लाख (रुपये चार लाख) दंड लागु केला आहे. हा दंड, सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (एसएएफ) खाली रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणे, ग्राहकांना युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड (युसीआयसी) न देणे, जोखीम वर्गीकरण व कस्टमर प्रोफाईल ह्यांना अनुसरुन/धरुन व्यवहार नसल्यास, इशारा (अलर्ट) देण्याची प्रणाली न ठेवणे, रु.10.00 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांचे रेकॉर्ड न ठेवणे व तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) व अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) मार्गदर्शक तत्वांनुसार, असे व्यवहार, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट-इंडिया (एफआययु-आयएनडी) ह्यांना न कळविणे ह्यासाठी लावण्यात आला आहे. मार्च 31, 2016 रोजीच्या वित्तीय स्थितीच्या तपासणीत आढळलेल्या बाबींच्या आधाराने, भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते, आणि अहमदाबाद येथील भारतीय रिझर्व बँकेत, वरिष्ठ अधिका-यांसमोर वैय्यक्तिक सुनावणीही सादर केली होती. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर ह्यांना विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2789 |