<font face="mangal" size="3">सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलं - आरबीआय - Reserve Bank of India
सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलंगणा - ह्यांचेवर दंड लागु.
फेब्रुवारी 1, 2018 सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलंगणा - ह्यांचेवर दंड लागु. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 अ (1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलंगणा ह्यांना रु.0.50 लाख (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून, तो दंड, एक्सपोझर नॉर्म्स/इतर निर्बंध, व तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) नॉर्म्स/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) मेझर्स ह्याबाबत रिझर्व बँकेने दिलेले आदेश व मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केल्या गेल्याने लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बाबी व बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2094 |