<font face="mangal" size="3">दि श्रीकलाहस्ती को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., श्रीक& - आरबीआय - Reserve Bank of India
दि श्रीकलाहस्ती को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., श्रीकलाहस्ती, आंध्रप्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
फेब्रुवारी 21, 2019 दि श्रीकलाहस्ती को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., श्रीकलाहस्ती, आंध्रप्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 च्या पोटकलम 4 सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि श्रीकलाहस्ती को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., श्रीकलाहस्ती, आंध्रप्रदेश ह्यांचेवर रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड, भारतीय रिझर्व बँकेने अनुपालन अहवाल पाठविण्याबाबत दिलेले निर्देश/मार्गदर्शक तत्वे/सूचनांचे उल्लंघन केले गेले असल्याने लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने त्यावर दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1998 |