<font face="mangal" size="3">दि अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., मऊनाथ भंजन (युपी) ह्ë - आरबीआय - Reserve Bank of India
दि अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., मऊनाथ भंजन (युपी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
मार्च 13, 2019 दि अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., मऊनाथ भंजन (युपी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., मऊनाथ भंजन (युपी) ह्यांना रु.3,00,000/- (रुपये तीन लाख) दंड लागु केला असून, हा दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 36 (1) खाली दिलेल्या पर्यवेक्षणीय सूचना सीआयसींचे सभासदत्व, प्रुडेंशियल नॉर्म्स - एकल आंतर बँकीय प्रतिपक्ष मर्यादा, संचालक संबंधित कर्जे, असुरक्षित कर्जे आणि नेमलेला संचालक ह्यांच्याशी संबंधित आरबीआयच्या सूचना/मार्गदर्शन तत्वे ह्यांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, त्या बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला की, उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अनिरुध्द डी. जाधव वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2171 |