<font face="mangal" size="3">तुमकुर ग्रेन मर्चन्टस् को-ऑपरेटिव बँक लि., तुम& - आरबीआय - Reserve Bank of India
तुमकुर ग्रेन मर्चन्टस् को-ऑपरेटिव बँक लि., तुमकुर, कर्नाटक ह्यांना आर्थिक दंड लागु
मे 4, 2018 तुमकुर ग्रेन मर्चन्टस् को-ऑपरेटिव बँक लि., तुमकुर, कर्नाटक ह्यांना आर्थिक दंड लागु. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, तुमकुर ग्रेन मर्चन्टस् को-ऑपरेटिव बँक लि., तुमकुर, कर्नाटक ह्यांना, रु.5.0 लाख (रुपये पाच लाख) दंड लावला आहे व हा दंड, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निकष/अँटी-मनी लाँडरिंग मानके (एएमएल)/आर्थिक दहशतवादाशी सामना करणे (सीएफटी)/पीएमएलए 2002 खालील बँकेची दायित्वे ह्यावरील, आरबीआयने दिलेल्या महापरिपत्रक डीबीआर.एएमएल.बीसी.क्र.15/14.01.001/2015-16 दि. जुलै 1, 2015 मधील परिच्छेद 3.2.2.4.डी मध्ये दिलेल्या सूचनांचे/मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याने लागु करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने एक लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निर्णय घेतला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2912 |