<font face="mangal" size="3">युनिव्हर्सल को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., मांचेरि - आरबीआय - Reserve Bank of India
युनिव्हर्सल को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., मांचेरिअल, तेलंगणा ह्यांना दंड लागु
मे 9, 2018 युनिव्हर्सल को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., मांचेरिअल, तेलंगणा ह्यांना दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 अ(1)(क) ने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, युनिव्हर्सल को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., मांचेरिअल, तेलंगणा ह्यांचेवर रु.0.50 लाख (रुपये पन्नास हजार) दंड लावला आहे व हा दंड, संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना द्यावयाची कर्जे व अग्रिम राशी ह्यावर भारतीय रिझर्व बँकेने दिलेले निर्देश व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याने लावण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन, भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2948 |