RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78515470

अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बदायुं, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

मार्च 1, 2019

अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बदायुं, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बदायुं, उत्तर प्रदेश ह्यांचेवर, रु.5,00,000/- (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून हा दंड, वरील बँकेला दिलेल्या पर्यवेक्षणीय सूचना, आंतर बँकीय ठेवींवरील ढोबळ व प्रतिपक्ष एक्सपोझर मर्यादा ह्यावरील प्रुडेंशियल नॉर्म्स, गुंतवणुक व्यवहारांचे काँकरंट ऑडिट, व्यावसायिक संचालक, केवायसी/एएमएल मार्गदर्शक तत्वे आणि क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांचे सभासदत्व ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने त्यावर दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2074

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?