RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78490697

अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बस्ती (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

ऑक्टोबर 17, 2018

अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बस्ती (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बस्ती (यु.पी.) ह्यांचेवर रु.10,00,000/- (रुपये दहा लाख) दंड लागु केला आहे. हा दंड, आरबीआयची पूर्व परवानगी घेतल्याशिवायच ऑन-साईट एटीएम उघडणे, एक्सपोझर नॉर्म्स व वैधानिक/इतर सूचना-युसीबीज, केवायसी/एएमएल नॉर्म्स व युसीबीकडून केलेल्या गुंतवणुकी ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले जाण्यामुळे लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/909

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?