<font face="mangal" size="3">एटीएम्सचा वापर : ग्राहक-आकार रद्द</font> - आरबीआय - Reserve Bank of India
78489694
प्रकाशित तारीख
नोव्हेंबर 14, 2016
एटीएम्सचा वापर : ग्राहक-आकार रद्द
नोव्हेंबर 14, 2016 एटीएम्सचा वापर : ग्राहक-आकार रद्द भारतीय रिझर्व बँकेकडून आज ठरविण्यात आले आहे की, त्यांच्या बचत खातेधारकांनी त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएम्समध्ये, तसेच इतर बँकांच्याही एटीएम्समध्ये केलेल्या सर्व व्यवहारांसाठी (वित्तीय तसेच अवित्तीय दोन्हीही व्यवहार समाविष्ट), त्या महिन्यात केलेल्या व्यवहारांची संख्या कितीही असली तरी, त्याबाबत लागु असणारे एटीएम आकार रद्द केले जातील. एटीएम वापरावरील आकार रद्द होणे, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर, नोव्हेंबर 10, 2016 ते डिसेंबर 30, 2016 पर्यंत लागु असेल. अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1199 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?