RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78489748

एटीएम्सचा वापर - ग्राहक आचार लागु न होणे

आरबीआय/2016-17/132
डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.1240/02.10.004/2016-2017

नोव्हेंबर 14, 2016

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
आरआरबींसह सर्व अधिसूचित वाणिज्य बँका/नागरी सहकारी बँका/
राज्य सहकारी बँका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स

महोदय/महोदया,

एटीएम्सचा वापर - ग्राहक आचार लागु न होणे

बचत बँक ग्राहकांनी त्यांच्या बँकांच्या एटीएम्समध्ये तसेच इतर बँकांच्या एटीएम्समध्ये केलेल्या व्यवहारांसाठी निःशुल्क एटीएम व्यवहारांची अपरिहार्य संख्येचे पुनःसंघटन ह्यावरील परिपत्रक डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.316/02.10.002/2014-2015 दि. ऑगस्ट 14, 2014 कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान नोटांचे वैध चलन लक्षण बाद करण्यावरील परिपत्रक क्र. डीसीएम (पीएलजी) क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 आणि एटीएम्स बंद करणे व डिसेंबर 30, 2016 पर्यंत एटीएम्समधून केलेल्या निकासींवरील आकार काढून घेण्यात येणे ह्यावरील परिपत्रक आरबीआय /2016-17/111 डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र./02.10.002/2016-2017 दिनांक नोव्हेंबर 8, 2016 कडेही आपले लक्ष वेधण्यात येत आहे.

(2) ह्या बाबतीत असे ठरविण्यात आले आहे की, बचत खाते ग्राहकांनी, त्यांच्या बँकेच्या एटीएम्समध्ये तसेच इतर बँकांच्या एटीएम्समध्ये केलेल्या सर्व व्यवहारांसाठी (वित्तीय तसेच अवित्तीय अशा दोन्हीही) बँका एटीएम आकार लावणार नाहीत, मग त्या महिन्यातील व्यवहारांची संख्या कितीही असो.

(3) नोव्हेंबर 10, 2016 ते डिसेंबर 30, 2016 पर्यंत करण्यात आलेल्या व्यवहारांसाठी, पुनरावलोकनाच्या अटीवर हे लागु असेल.

(4) प्रदान व तडजोड प्रणाली अधिनियम, 2007 च्या (2007 चा 51) कलम 18 सह वाचित, कलम 10(2) खाली हे निदेश देण्यात येत आहेत.

आपली विश्वासु,

(नंदा एस दवे)
मुख्य महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?