<font face="mangal" size="3">रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक&# - आरबीआय - Reserve Bank of India
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - मर्यादांमध्ये सुधारणा/बदल
आरबीआय/2016-17/141 नोव्हेंबर 20, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - मर्यादांमध्ये सुधारणा/बदल कृपया आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र. 1272/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 13, 2016 च्या परिच्छेद 1(2) चा संदर्भ घ्यावा. त्यानुसार, रिकॅलिब्रेट केलेल्या एटीएम्समधून काढावयाच्या रोख रकमेची दैनिक मर्यादा, रु.2000/- वरुन रु.2500/- पर्यंत वाढविण्यात आली असून, बँकांच्या एटीएम्सचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत ती रु.2000/- एवढीच ठेवण्यात आली आहे. (2) एटीएम्सच्या रिकॅलिब्रेशनवर जवळून नजर ठेवण्यात येत आहे व त्याबाबत लक्षणीय प्रगती केली गेली आहे. पुनरावलोकन केल्यावर, पुढील सूचना मिळेपर्यंत ह्या मर्यादांमध्ये बदल न करण्याचे ठरविण्यात आले आहे. कॅलिब्रेट न केलेल्या एटीएम्समधून, ती एटीएम्स रिकॅलिब्रेट होईपर्यंत, त्यांच्यामधून रु.50 व रु.100 च्या नोटा वितरित करणे बँकांनी सुरुच ठेवावे. (3) कृपया पोच द्यावी. आपली विश्वासु (सुमन रे) |