बँक ठेव खात्यामधून रोख रक्कम काढणे - शिथिलीकरण
|
आरबीआय/2016-17/163 नोव्हेंबर 28, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, बँक ठेव खात्यामधून रोख रक्कम काढणे - शिथिलीकरण असे कळविण्यात आले आहे की, खात्यांमधून रोख रक्कम काढण्यावरील विद्यमान मर्यादांमुळे काही ठेवीदार, त्यांचा पैसा बँक खात्यात जमा करण्यात चाल ढकल करत आहेत. (2) ह्याचा परिणाम बँक नोटांच्या प्रत्यक्ष प्रसारावर होत असल्या कारणाने काळजीपूर्वक विचार करुन असे ठरविण्यात आले आहे की, नोव्हेंबर 29, 2016 रोजी किंवा त्यानंतर, विद्यमान वैध चलनी नोटांमध्ये केलेल्या ठेंवीची (जमा रकमेचे) निकासी, विद्यमान मर्यादेपलिकडे, करण्यास परवानगी दिली जावी. ह्यासाठी शक्यतो रु.2000 व रु.500 अशा उच्च मूल्याच्या नोटा अशा निकासींसाठी दिल्या जाव्यात. आपली विश्वासु, (पी विजया कुमार) |
पेज अंतिम अपडेट तारीख: