<font face="mangal" size="3">रोख रक्कम काढणे - साप्ताहिक मर्यादा</font> - आरबीआय - Reserve Bank of India
रोख रक्कम काढणे - साप्ताहिक मर्यादा
आरबीआय/2016-17/158 नोव्हेंबर 25, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, रोख रक्कम काढणे - साप्ताहिक मर्यादा कृपया अनुक्रमे नोव्हेंबर 13 व नोव्हेंबर 14, 2016 ची परिपत्रके डीसीएम(पीएलजी)क्र. 1272/10.27.00/2016-17 आणि 1273/10.27.00/2016-17 चा संदर्भ घ्यावा. येथे बँकांना सांगण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या विद्यमान ग्राहकांना, प्रति सप्ताह रु.24,000/- काढण्यासाठी दिलेली परवानगी पुढील सूचना मिळेपर्यंत सुरुच ठेवावी. आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1304/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 20, 2016 मध्ये दिलेल्या अटीनुसार एटीएम मधून केलेली निकासी ह्या मर्यादेत समाविष्ट आहे. (2) कृपया पोच द्यावी. आपली विश्वासु, (सुमन रे) |