RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78499335

500 व 1000 च्या नोटांची कायदेशीर वैधता (लीगल टेंडर करेक्टर) काढून घेणे बाबत :- आर.बी. आय. स्टेटमेंट

12 नवंबर 2016

500 व 1000 च्या नोटांची कायदेशीर वैधता
(लीगल टेंडर करेक्टर) काढून घेणे बाबत :- आर.बी. आय. स्टेटमेंट

व्यवहारात प्रचलित असलेल्या 500 व 1000 च्या नोटांची कायदेशीर वैधता वर्ष (लीगल टेंडर करेक्टर) काढून घेण्याची जबाबदारी बँकींग प्रणाली वर आहे, शक्य तितक्या सहजतेने व सुलभतेने कायदेशीर वैधता असलेल्या इतर मुल्य वर्गाच्या नोटांमध्ये विनिमय करण्याचीही मोठी जबाबदारी आहे. उदघोषणेच्या नंतर थोड्याच वेळात, विशिष्ठ बँक नोट ज्या कायदेशीर वैध आहेत, त्यांच्यासाठी एटीएम मशीनची दोन दिवसात पुर्नरचना करणे, कायदेशीर वैध असलेल्या नोटा त्यामध्ये लोड करणे आणि संपुर्ण देशभरातील नागरिकांसाठी विनिमय सुविधा उपलब्ध करणे आदि गोष्टींसाठी सामोरे जावे लागणार आहे. सामान्य जनतेला कोणतीही असुविधा होऊ नये म्हणून सर्व बँकांच्या सर्व शाखा आणि रिजर्व बँकेची सर्व कार्यालये आपल्या नियमित कार्यालयीन वेळे पेक्षा जास्त वेळ कार्यरत आहेत. जनतेच्या प्रचंड गर्दीसाठी अतिरिक्त काउंटर्स उघडण्यात आली आहेत. 10 नोहेंबर 2016 रोजी एकूण 10 करोड विनिमय व्यवहारांची नोंद झाली आहे.

ह्या व्यतिरिक्त लोकांच्या तातडीच्या गरजा मिटवण्यासाठी व परिस्थीती सामान्य होण्यासाठी बँकांची व रिजर्व बँकेची कार्यालये शनिवार व रविवार रोजी पण उघडी ठेवण्यात आली होती.

कायदेशीर वैधता असलेल्या मुल्य वर्षाच्या चलनी नोटांची ( 2000 सहीत) गरज लक्षात घेता, संपुर्ण देशभरात असलेल्या सुमारे 4000 करेंसी चेस्टमध्ये त्यांची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. आपली गरज पुर्ण करण्यासाठी बँक ब्रांचेस करंसी चेस्टशी जोडण्यात आले आहेत. जनतेची गरज पुर्ण करण्यासाठी करंसी छापखाने त्यांच्या पुर्ण क्षमतेनुसार जरूरीप्रमाणे साठा उपलब्ध होण्यासाठी कार्यरत आहेत.

असे सर्व प्रयत्न चालू असताना, जनतेला पेमेंट प्रणालीचे अन्य उपलब्ध मार्ग, जसे की, प्री-पेड कार्डस, रूपे / क्रेडिट / डेबिट कार्ड्स, मोबाईल बँकींगचा वापर करण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. जन-धन योजने अंतर्गत ज्यांनी आपली खाती उघडली आहेत व ज्यांना कार्ड प्राप्त आहे अश्यांना त्याचा उपयोग करावा असे आवाहन करण्यात येत आहे. अश्या प्रकारचा उपयोग करण्याने प्रत्यक्ष चलनावरती असलेल्या दबावाचा उपशमन होण्यास मदत होईल व डीजीटल जगामध्ये राहण्याचा अनुभव वाढेल.

विशिष्ठ मुल्य वर्गाच्या बँक नोट बदलण्याची योजना संपुर्ण देशभरामध्ये 30 डिसेंबर 2016 उपलब्ध आहे व तदनंतर ठराविक रिजर्व बँकेच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहे. अजुन भरपूर वेळ उपलब्ध असल्याने लोकांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी करून बँकींग ब्रांच नेटवर्क वर ताण आणू नये.

अल्पना किल्लावाला
प्रिंसिपल एडवायजर

प्रेस प्रकाशनी: 2016-2017/1190

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?