RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78489611

एसबीएनचे वैध चलन लक्षण काढून घेण्यात येणे : असुरक्षित/अनधिकृत वाहिन्यांवरुन मिळालेल्या माहिती विरुध्द आरबीआयचा सावधानतेचा इशारा

डिसेंबर 01, 2016

एसबीएनचे वैध चलन लक्षण काढून घेण्यात येणे : असुरक्षित/अनधिकृत वाहिन्यांवरुन
मिळालेल्या माहिती विरुध्द आरबीआयचा सावधानतेचा इशारा

विहित बँक नोटांचे (एसबीएन) वैध चलन लक्षण काढून टाकण्यात आले असल्याने, भारतीय रिझर्व बँक, बँकांना वेळोवेळी सूचना पाठवीत आहे व ह्या सूचना बँकांकडे थेट व ई-मेल द्वारा पाठविल्या जात आहेत. ह्या सूचना रिझर्व बँकेच्या वेब साईटवरही (/en/web/rbi) टाकण्यात आल्या आहेत.

आम्हाला असेही कळविण्यात आले आहे की, काही मार्गदर्शक तत्वे/सूचना रिझर्व बँकेनेच दिलेल्या असल्याचे भासवून, काही तत्वशून्य घटकांकडून त्या सामाजिक माध्यमांमधून प्रसारित केल्या जात असून त्यामुळे जनता/बँक अधिका-यांच्या मनात गोंधळ निर्माण होत आहे.

ह्यासाठी, जनतेला व बँकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी केवळ रिझर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर (/en/web/rbi) अपलोड केलेल्या किंवा रिझर्व बँकेच्या अधिकृत ई-मेल द्वारा मिळालेल्या सूचनांचेच मार्गदर्शन घ्यावे.

बँका तसेच जनतेला सांगण्यात येते की, त्यांनी इतर असुरक्षित/सामाजिक माध्यमांसारख्या अनधिकृत वाहिन्यांवर विश्वास ठेवू नये, कारण त्यांच्यामधून प्रसारित केलेले कागदपत्र शंकास्पद व पडताळून न पाहण्याजोगे असतात.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1382

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?