RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

133503240

भारतीय रिझर्व्ह बँकेने खुश हाउसिंग फाइनेंस प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2025 रोजीच्या आदेशाद्वारे खुश हाउसिंग फाइनेंस प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र (कंपनी) वर भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या (KYC)’ वर जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹16000/- (केवळ सोळा हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. नॅशनल हाऊसिंग बँक ॲक्ट, 1987 च्या कलम 52A अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

नॅशनल हाऊसिंग बँकद्वारे कंपनीची 31 मार्च 2022 आणि 31 मार्च 2023 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी करण्यात आली होती. आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे पर्यवेक्षी निष्कर्ष आणि त्या संदर्भात संबंधित पत्रव्यवहार यांवर आधारित, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, वरील निर्देशांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती. बँकेने नोटिशीला दिलेल्या उत्तर आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरीकरण यांचा विचार केल्यानंतर, भारतीय रिझर्व्ह बँकेला, आढळले की, बँकेविरुद्ध पुढील आरोप कायम आहे, ज्यामुळे बँकेवर आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

कंपनी तिच्या ग्राहकांचे जोखीम वर्गीकरण करण्यात अपयशी ठरली.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे कंपनीने तिच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. याशिवाय, हा आर्थिक दंड लादणे हे कंपनीच्या विरोधात आरबीआयने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता आहे.

     (पुनीत पंचोली) 
मुख्य महाप्रबंधक

Press Release: 2025-2026/468

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?