भारतीय रिझर्व्ह बँकेने रतनचंद शाह सहकारी बँक लिमिटेड, मंगळवेढा (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिझर्व्ह बँकेने रतनचंद शाह सहकारी बँक लिमिटेड, मंगळवेढा (महाराष्ट्र) वर आर्थिक दंड ठोठावला
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआई) दिनांक 30 मे 2025, रोजीच्या आदेशाद्वारे , रतनचंद शाह सहकारी बँक लिमिटेड, मंगळवेढा महाराष्ट्र (बँक) वर ‘आपला ग्राहक जाणून घ्या (KYC)’ व आरबीआई पर्यवेक्षी कृती चौकटी (SAF) अन्तर्गत जारी केलेल्या विशिष्ट निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹2.00 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये आरबीआई ला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यात बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारांच्या किवा करारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही. तसेच, बँकेविरुद्ध भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेल्या इतर कोणत्याही कारवाईबद्दल पूर्वग्रह न ठेवता हा आर्थिक दंड लावला आहे.
(पुनीत पंचोली) प्रेस प्रकाशनी: 2025-2026/487 |