<font face="mangal" size="3"> फिनटेकच्या संधी व आव्हाने श्री. शक्तिकांत दा&# - आरबीआय - Reserve Bank of India
फिनटेकच्या संधी व आव्हाने श्री. शक्तिकांत दास, गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँक ह्यांनी - मार्च 25, 2019 रोजी, निती आयोगाच्या फिनटेक कॉनक्लेव्हमध्ये दिलेले भाषण
निती आयोगाच्या फिनटेक कॉनक्लेव्ह 2019 मध्ये भाग घेताना आणि वित्त क्षेत्राच्या भविष्यकाळाला आकार देणा-या तंत्रज्ञान क्रांतीवरील माझे विचार शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. ह्या महत्वाच्या मेळाव्यात मला आमंत्रित केल्याबद्दल मी, श्री. अमिताभ कांत, निती आयोगाचे सीईओ ह्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या समजुतीनुसार हे कॉनक्लेव्ह, भारतीय फिनटेक अर्थप्रणाली तसेच, विकास, रोजगार व समावेशन ह्यांच्यासाठी हे क्षेत्र देऊ करत असलेल्या संभाव्यता साध्य करण्यासाठी मदत करण्यासाठीची आवश्यक पाऊले उचलण्यासाठी आहे. फिनटेकची मोठी व्याप्ती लक्षात घेऊन त्यातील काही मूलभूत प्रश्नांवरील माझे विचार मी एकत्र केले आहेत. (2) सर्वसामान्यतः फिनटेक म्हणजे वित्तीय तंत्रज्ञान (फायनान्शियल टेकनॉलॉजी) आणि ते, तंत्रज्ञान आधारित वित्तीय नूतन पध्दती. स्टार्ट-अप’ ते बिग टेक’ ते सुस्थापित वित्तीय संस्थांपर्यंत, सर्व महत्वाच्या संस्था, त्यांच्या वित्तीय सेवा शृंखलेमध्ये ह्या तंत्रज्ञानाचा वापर अंतिम उपयोजकाल, त्वरित सक्षम व विशेष अनुभव देण्यासाठी करत आहेत. जेथे स्पर्धात्मक मूल्यांचे अधिकतर पर्याय ग्राहक निवडू शकेल आणि वित्तीय संस्था कमी कार्यकारी खर्चात त्यांची क्षमता सुधारु शकतील अशा, वित्तीय क्षितिजात मूलभूत क्रांति करण्याची संभाव्यता ह्या हालचालीत/चळवळीत आहे. परवडणा-या खर्चात जागतिक वित्तीय समावेशन मिळविण्याचा दृढ निश्चय केलेल्या ह्या देशात, आपल्यासाठी हा एक निर्णायक क्षण आहे आणि आपण ही संधी घेतलीच पाहिजे. भारतातील फिनटेक अनुभव (3) ह्या क्रांतीमध्ये/सुधारणेमध्ये भारत आघाडीवरच आहे. अलिकडील जागतिक सर्वेक्षणानुसार 52% स्वीकार दर(1) असलेला भारत फिनटेक स्वीकाराच्या बाबतीत जगात दुस-या क्रमांकावर आहे. असे सांगण्यात येते की, भारतामध्ये कार्यरत असलेल्या 1218 फिनटेक संस्था असून त्यामुळे अनेक रोजगार निर्माण झाले आहेत. आणि त्या संस्था गुंतवणुकीसाठी निरोगी गरज निर्माण करत आहेत. (4) ‘कमी रोकड’ समाज निर्माण तयार करण्यासाठी, रिझर्व्ह बँक अनेक वर्षे इलेक्ट्रॉनिक प्रदानाचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ह्याचा उद्देश म्हणजे, सुरक्षा, सुरक्षितता, बढती, सोय व प्रवेश क्षमता, जलद प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त सोल्युशन्स ह्या सर्वांचा समावेश असलेली एक प्रदान प्रणाली उपलब्ध करुन देणे. ह्यामधील अन्य मुख्य क्षेत्रे म्हणजे, परवडणारा खर्च, आंतर-क्रियाशीलता व ग्राहक जाणीव आणि संरक्षण. प्रदान सेवांसाठी बँका हे एक पारंपरिक द्वार/साधन आहे. तथापि, तंत्रज्ञानाच्या जलद गती-प्रगतीमुळे, प्रदान हा केवळ बँकांचाच एकाधिकार आता राहिलेला नाही. बिगर बँकिंग संस्थाही आता बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवठेदार म्हणून किंवा थेट रिटेल इलेक्ट्रॉनिक प्रदान सेवा देऊन बँकांशी सहकार्य करत आहेत व स्पर्धाही करत आहेत. प्रदानाच्या क्षेत्रात बिगर-बँक संस्थांचा ह्या वाढत्या सहभागाला विनियामक साचानेही प्रोत्साहन दिले आहे. (5) अलिकडील वर्षात, एक स्टेट ऑफ दि आर्ट म्हणता येईल असे राष्ट्रीय प्रदान पायाभूत सोयी व तंत्रज्ञान मंच विकसित करण्यावर केंद्रीभूत असे प्रयत्न करण्यात आले आहेत. मग जसे, त्वरित प्रदान सेवा (आयएमपीएस), युनिटाईड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय), भारत इंटरफेस फॉर मनी (भीम), भारत बिल पे सिस्टीम (बीबीपीएस) किंवा आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम (एईपीएस) ह्यामुळे देशाच्या फुटकळ प्रदानांच्या क्षेत्रात बदल झाला आहे. गेल्या पाच वर्षात रिटेल इलेक्ट्रॉनिक प्रदानांच्या आकारमानात नऊ पट वाढ झाली आहे. (6) आता मी, प्रदानांच्या डिजिटल पध्दतीसंबंधाने काही आकडेवारी सांगू इच्छितो. एनईएफटी प्रणालीने, 2017-18 मध्ये, रु.172 लाख कोटींचे, 195 कोटी व्यवहार केले. म्हणजेच, गेल्या पाच वर्षांमध्ये आकारमानात 4.9 पट वाढ झाली व मूल्यात 5.9 पट वाढ झाली. त्याचप्रमाणे, 2017-18 मध्ये क्रेडिट व डेबिट कार्डांमधून केलेल्या व्यवहारांची संख्या अनुक्रमे 141 कोटी व 334 कोटी होती. प्रिपेड प्रदान संलेखांचे (पीपीआय) आकारमान 1.4 लक्ष कोटी मूल्याच्या सुमारे 346 कोटी होते. अशा प्रकारे, 2017-18 मधील आकारमानाच्या हिशेबातील एकूण कार्ड-प्रदान हे एकूण फुटकळ प्रदानांच्या 52% होते. (7) बँकिंग तंत्रज्ञान व व्यापार-वित्त ह्या क्षेत्रातील विकासही कौतुकास्पदच आहे. कर्ज देणे व भांडवल उभारणी मधील पर्यायी मॉडेल्सही आता वर येत असून त्यात पारंपरिक धनको व पारंपरिक मध्यस्थ संस्था ह्यांची गतिशीलता बदलण्याचे सुप्त सार्मथ्य आहे. क्राऊड फंडिग म्हणजे, निवेशकांच्या मोठ्या गटाकडून बाह्य वित्त उभे करणे. सध्या भारतात सुप्त म्हणजे नेसंट अवस्थेत आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये आरबीआयने महानिर्देश दिलेल्या पीअर टु पीअर (पी2पी) कर्ज देण्याबाबतही, लघु व मध्यम उद्योगांना वित्त मिळविण्यासाठीच्या प्रवेशात सुधारणा करण्याचे सुप्त सार्मथ्य आहे. ह्या पी2पी मंचावर कार्य करण्यास अकरा संस्थांना परवाने देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने सात केवळ डिजिटल कर्ज कंपन्यांना (एनबीएफसी) परवाने देऊन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ते केवळ मोबाईल अॅप्लिकेशन द्वारा कार्य/व्यवहार करणारे डिजिटल प्लेयर्स असले तरी, गरज पडल्यास त्यापैकी एक तरी ग्राहकांसाठी उपलब्ध असेल ह्याची आम्ही खात्री करुन घेतली आहे. (8) ह्याशिवाय, सात प्रदान बँकांनीही व्यवसाय सुरु केला आहे. ह्या तंत्रज्ञानयुक्त बँका, येणा-या ग्राहकांसाठी तसेच कार्यकृती करण्यासाठी फिनटेकचा वापर करतात. (9) भारतामधील फिनटेक अॅप्लिकेशनसाठी इनव्हॉईस ट्रेडिंग हे आणखी एक सुप्त क्षेत्र आहे. बिलांचे प्रदान विलंबाने झाल्यामुळे अनेकदा कार्यकारी भांडवल व कॅश फ्लोच्या समस्या असलेल्या एमएसएमईंना त्याची मदत होते. रिझर्व्ह बँकेने ट्रेड रिसीव्हेबल्स डिसकाऊंटिंग सिस्टिम (टीआरईडीएस) स्थापन केली असून ती, देयके व इनव्हॉईसेसचे डिस्काऊंटिंग करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली नाविन्यपूर्ण वित्त-सहाय्याची एक व्यवस्था आहे. ह्यासाठी तीन संस्थांना प्राधिकृत केले असून हळुहळु त्याचे आकारमान गतिशील होत आहे. (10) ह्याबाबतचा आणखी एक पुढाकार म्हणजे, अकाऊंट अॅग्रिगेटर्ससाठी (एए) एक विनियामक साचा तयार करणे. एनबीएफसी-एए म्हणून पाच संस्थांना तत्वतः मंजुरी देण्यात आली असून, 2019-20 मध्ये त्या संस्था कार्यरत होणे अपेक्षित आहे. (11) फिनटेकच्या मार्फत डिजिटल प्रदाने व वित्तीय समावेशन अधिक खोलवर जाण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय), श्री. नंदन निलेकणी ह्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सभासदांची एक समितीही स्थापन केली आहे. (12) फिनटेक क्रांतीमुळे संधीचे एक नवे जग निर्माण झाले तरी विनियामक व पर्यवेक्षक ह्यांच्या समोर जोखमी व आव्हाने आहेतच. ह्या जोखमी अधीन ओळखून संबंधित विनियामक व पर्यवेक्षणात्मक आव्हाने सौम्य करण्यासाठी कृती करणे हीच ह्या विकासांचे संपूर्ण सार्मथ्य मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. ह्यासाठीच भारताच्या संदर्भात ह्या संधी, जोखमी व आव्हाने व धोरणे ह्याबाबतचे विहंगम दृष्य मी येथे देऊ इच्छितो. संधी, जोखमी व पुढील मार्ग प्रथम मी, डिजिटल ऑन बोर्डिंग व वित्तीय समावेशन ह्या क्षेत्रातील संधी निर्देशित करतो. डिजिटल ऑन बोर्डिंग व वित्तीय समावेशन (13) भारतीय संदर्भात, लक्षवेधी अशी दोन मोठी क्षेत्रे आहेत : पहिले क्षेत्र म्हणजे, फिनटेकचा वापर करुन, वित्तीय मंचापर्यंत पोहोचण्यातील सुलभता सुधारणे व दुसरे क्षेत्र, फिनटेकचा स्वीकार केल्यानंतर निर्माण होऊ शकणा-या संभाव्य जोखमींचे विश्लेषण करण्यासंबंधाने आहे. ह्यातील पहिले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, वित्त-वंचित लोकसंख्येच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी सुयोग्य वित्तीय उत्पाद तयार करणे, डिजिटल ऑन बोर्डिंग आणि गुंतवणुकी वाढविणे ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी) च्या बाबत होत असल्याप्रमाणे, डिजिटल मंचाचा स्वीकार करण्यासाठी, आधार इको-सिस्टिमचा परिणामकारक वापर लोकांना प्रोत्साहन देऊ शकतो. ह्याबाबत, केंद्रीय केवायसी पंजीकरण ही एक लक्षणीय पायरी आहे. ह्या मंचावर सुमारे 100 दशलक्ष केवायसी रेकॉर्ड्स अपलोड करण्यात आले आहेत. आंतर-क्षेत्रीय असामनता सक्षमतेने हाताळण्यासाठी बहुभाषीय वित्तीय साक्षरता मिळवून व 2 सशक्त तक्रार निवारण यंत्रणा ठेवून ऑफ-लाईन तक्रार निवारण करणे आवश्यक आहे. रेगटेक व सुपटेक (14) संभाव्य जोखमी व त्यांचे सौम्यीकरण ह्याबाबत रेगटेक(2) व सुपटेक(3) महत्वाची भूमिका बजावतात. विनियामक व पर्यवेक्षक ह्यांनी ऑफ-साईट व जलद देखरेख/नजर ठेवणे आवश्यक आहे. ह्यासाठी, एक पारदर्शक व तंत्रज्ञान व डेटा-चालित दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी, रेगटेक व सुपटेक नावाची दोन क्षेत्रे उदयास येत आहेत. ह्या दोन्हीही तंत्रज्ञानांचे उद्दिष्ट, स्वयंचालनाचा वापर, नविन शक्यतांचा स्वीकार व कामांना स्ट्रीमलाईन द्वारे क्षमता वाढविणे हे आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये आम्ही माहिती गोळा करण्यासाठी व विश्लेषण ह्यासाठी सुपरटेकचा उपयोग करतो. ह्याची काही उदाहरणे म्हणजे, इंपोर्ट डेटा प्रोसेसिंग अँड मॉनिटरिंग सिस्टिम (आयडीपीएमएस), एक्सपोर्ट डेटा प्रोसेसिंग अँड मॉनिटरिंग सिस्टिम (ईडीपीएमएस) आणि सेंट्रल डिपॉझिटरी ऑफ इन्फर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्स (सीआरआयएलसी). त्याचप्रमाणे, बँकांचे जोखीम आधारित पर्यवेक्षणही मोठ्या प्रमाणावर डेटा-चालित असून ते सुपटेकचे एक उदाहरण आहे. तथापि, रेगटेक व सुपटेकचा भविष्यकाळ, बिग डेटा अॅनालिटिक्स, कृत्रिम बुध्दिमत्ता, मशीन लर्निंग, क्लाऊड काँप्युटिंग, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) मॅचिंग, डेटा ट्रान्स्फर प्रोटोकॉल्स, बायोमेट्रिक्स इत्यादींवर अवलंबून आहे. (15) निर्माण होणा-या जोखमींचे व्यवस्थापन करण्यात यश मिळविण्यासाठी एक सशक्त जोखीम संस्कृती, की जिच्यात, जोखीम ओळखणे, मूल्यमापन, त्या सौम्य करणे ही बँक कर्मचा-यांची दैनंदिन कामे असतील - असणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे, न टिकू शकणारी वर्ज वाढ, वाढलेली आंतर-जोडणी, पुनरावर्तन शक्यता, पर्यवेक्षकीय साचाच्या बाहेरील नव्या कार्यकृतींचे निर्माणे होणे, आणि कमी लाभ क्षमतेमुळे येणा-या वित्तीय जोखमी ह्यामुळे प्रणालीजन्य जोखमीही निर्माण होऊ शकतात. सरहद्दीपलिकडील कायदे व प्रश्न ह्यातूनही फिनटेक उत्पादांसाठी जोखमी निर्माण होऊ शकतात. माहितीची गोपनीयता व ग्राहक संरक्षण ही देखील लक्ष देण्यासाठीची महत्वाची क्षेत्रे आहेत. (16) नाविन्यपूर्णतेमधून वित्तीय समावेशनाचा कार्यक्रम गतिशील होऊ शकेल ह्यासाठी फिनटेक कंपन्यांशी नवीन जोडण्या तयार करण्याची शक्यता शोधण्यास, भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकांना प्रोत्साहित केले आहे. त्यासाठी, म्हणूनच संपूर्ण संभाव्यता साध्य करण्यासाठी ह्या क्षेत्रामधील गुंतवणुकींचा प्रवाह अखंडित ठेवणे अत्यावश्यक आहे. संभाव्य अर्थव्यवस्थेसाठी असलेल्या अडथळ्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देत असतानाच, असे सहकार्य निर्माण करणारी एक अर्थ प्रणाली निर्माण करणे आवश्यक आहे. (17) फिनटेकचा व्यवस्थित विकास होण्याची खात्री करण्यासाठी, वित्तीय प्रणालीतील त्यांचे महत्व स्ट्रीम-लाईन करण्याचा आणि सर्व ग्राहकांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी, आपण सुयोग्य असे विनियामक व पर्यवेक्षकीय साचे ठेवण्याची गरज आहे. ह्या क्षेत्राच्या विकास-गरजा ध्यानात ठेवून अशा साचांनी त्याचबरोबर येणा-या जोखमींकडेही लक्ष दिले पाहिजे. रिझर्व्ह बँकेचा फिनटेक व डिजिटल बँकिंग वरील कार्यकारी गटाने (फिनटेक व डिजिटल बँकिंग वरील कार्यकारी गट, नोव्हेंबर 2017) सूचित केले आहे की, जेथे अपयशाचे परिणाम स्वीकारले जातील व अपयशाच्या कारणांचे विश्लेषणही केले जाईल अशा, निश्चित केलेल्या अवकाशात व कालावधीमध्ये, फिनटेक सोल्युशन्सचा प्रयोग करण्यास एक ‘विनियामक सँडबॉक्स/इन्नोव्हेशन हब’ सुरु केला जावा अशा ‘विनियामक सँडबॉक्स’ मुळे कमी खर्चातही नाविन्यपूर्ण उत्पाद सुरु करण्यास कमी वेळ लागल्याने फिनटेक कंपन्यांना लाभदायक ठरेल. ह्यापुढे जाऊन रिझर्व्ह बँक अशी विनियामक सँडबॉक्स स्थापन करील व त्यासाठीची मार्गदर्शक तत्वे पुढील दोन महिन्यात दिली जातील. उपसंहार (18) भाषण संपवताना मला सांगावेसे वाटते की, भारतामधील वित्तीय समावेशन व वित्तीय सेवा ह्यांच्या क्षेत्राला मूलभूत रितींनी एक नवा आकार देण्याचे सुप्त सार्मथ्य फिनटेकमध्ये आहे. त्यामुळे खर्च कमी होतील व वित्तीय सेवांचा दर्जा व त्या मिळविणे ह्यात सुधारणाही होईल. प्रणालीजन्य आघात करणे व फिनटेकचा परिणामकारक वापर करणे ह्यामध्ये समतोल ठेवणे आपल्यासाठी गरजेचे आहे. तंत्रज्ञानांना प्रोत्साहन देऊन व जोखमी सांभाळून, एक अधिक समावेशक, कमी खर्चाची व लवचिक अशी एक नवीन वित्तीय प्रणाली निर्माण करण्यास आपण मदत करु शकतो. आभार (1) ईवाय फिनटेक अॅडॉप्शन इंडेक्स 2017 https://www.ey.com/Publication/vwLUAssets/ey-fintech-adoption-index-2017/$FILE/ey-fintech-adoption-index-2017.pdf येथे उपलब्ध. (2) रेगटेक हे एक अॅप्लिकेशन किंवा मंच असून त्याच्या वापराने, स्वयंचलित प्रक्रियांच्या द्वारे विनियामक अनुपालन अधिक सक्षम होते व अनुपालनाचा खर्चही कमी होतो. विनियामक आवश्यकता अधिक सक्षमतेने व परिणामकारक रितीने देण्यास मदत करणा-या तंत्रज्ञानावर रेगटेक लक्ष केंद्रित करते. (3) सुपटेक हे, पर्यवेक्षण करण्यास सहाय्य करण्यासाठी विनियामक व पर्यवेक्षक ह्यांनी वापरावयाचे एक तंत्रज्ञान आहे. सुपटेकची उद्दिष्टे म्हणजे, अखंडित व सरळसोट डेटा कलेक्शन/रिपोर्टिंग डेटा विश्लेषण व निर्णय-प्रक्रिया, सुलभीकृत लायसेसिंग, मार्केटवरील देखरेख व नजर, केवायसी/एएमएल/सीएफटी, सायबर सुरक्षा डेटा किंवा पुरावा आधारित धोरण निश्चिती. |