<font face="mangal" size="3">सूक्ष्म कर्ज, आणि एखादी सार्वजनिक पत-पंजीकरण &# - आरबीआय - Reserve Bank of India
सूक्ष्म कर्ज, आणि एखादी सार्वजनिक पत-पंजीकरण संस्था त्याला कसे सुदृढ करु शकते ह्यावरील काही विचार - भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. विरल व्ही. आचार्य ह्यांनी, डिसेंबर 15, 2018 रोजी आयआयटी, मुंबई टेक फेस्ट मध्ये केलेले भाषण
कधी कधी मी एखाद्या नवीन मतप्रवाहांवर लिहिण्यासाठी बसतो, तेव्हा एखाद्या खूप काम केल्याच्या दिवसाअखेर एखाद्या विषयावर विचार करत असताना, माझ्या मनात खोलवर रुजलेली आवडती गाणी कोणत्याही कारणाशिवाय आपसुकच पुनः पुनः वाजत राहतील त्याप्रमाणे माझ्या मनात तेच जुने विचार येत राहतात. माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्या डोळ्यांसमोर काही प्रतिमा झळकत राहतात. ह्या प्रतिमांचे वर्णन करण्याचा आणि त्यांच्या सरमिसळीचा माझ्यासाठीतरी काय अर्थ आहे हे समजण्याचा मी खूप वेळा प्रयत्न केला आहे. ह्या प्रतिमा, आपल्या सभोवती असलेल्या घराघरांमधील दैनंदिन परिस्थिती समजण्याचे एक माध्यम म्हणून अर्थव्यवस्था आणि वित्त ह्यांचा मी सर्वसाधारणतः कसा विचार केला पाहिजे, तसेच छोट्या छोट्या उपायांनी आणि अधून मधून मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती आणखी चांगली कशी करता येईल ह्यासाठीची अंतर्दृष्टी मला देत राहतात. खरे तर ‘इकॉनॉमिक्स’ ह्या शब्दाचा उगम ‘ऑईकोनोमिया’ ह्या ग्रीक संज्ञेमध्ये आहे आणि त्याचा अर्थ ‘घराचे व्यवस्थापन’. काळजीपूर्वक केलेल्या संशोधनाच्या आधारे अनेकांच्या मते (मुख्यतः प्रोफेसर अभिजित बॅनर्जी आणि मॅसॅच्युसेट्स इंन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) चे प्रो. एसार डफ्लो), घरांचे व्यवस्थापन नीट न ठेवले गेल्याने खर्च वाढत असल्याने केवळ गरीब लोकच सर्वोत्तम अर्थव्यवस्था ठेवत असतात. माझ्या डोळ्यांसमोर दिसणा-या एकेका प्रतिमेचे मी आता वर्णन करतो. पहिली प्रतिमा - मुंबई मधील आमच्या घराच्या गच्चीवर मी माझ्या भावाबरोबर अनेकदा संध्याकाळी किंवा रात्री फिरत असताना, एका बाजूला पवनहंस हेलिपॅड, नेहरु नगरच्या विशाल झोपडपट्या, स्वामी विवेकानंद मार्गावरील (एस व्ही रोड) कानठळ्या बसणारी रहदारी आणि त्याचबरोबर जुहू बीच वरील समुद्राच्या लाटांचा आवाज आणि समुद्रावरील शांत वारे असायचे. दक्षिण मुंबई मधील गिरगावातील एका गजबजलेल्या रस्त्यावर मी लहानाचा मोठा झालो. आमच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या खिडकीमधून, रस्त्यावरचे लोक आपापल्या कामांना कसे जात आहेत हे पाहणे हा आमचा शाळकरी दिवसांमधला आवडता छंद होता. ह्या सगळ्याच्या सवयीमुळे, मी गच्चीवर असलो की माझी नजर नेहरुनगरच्या झोपडपट्टीवर आपोआपच जात असे. ह्या अरुंद गल्ली बोळांमध्ये दाटीवाटीने कसेतरी राहणारे झोपडपट्टीतले निवासी, त्यांच्या सभोवती चालू असलेल्या अनेक कामांच्या पसा-यात दिसणा-या छोट्याशा आकृती वाटायच्या. एखादा मनुष्य त्याच्या झोपडीच्या निळ्या छपरावर डिश अँटेना बसवतो आहे, तर कुठे एखादे म्हातारे जोडपे त्यांच्या छोट्याशा झोपडीसमोर एखाद्या देशीगप्पांचा आस्वाद घेत आहे, एखादी बाई कपडे धुतांना त्यावर धोपटण्याने दणादण घाव घालते आहे. आणि बहुतेक वेळा क्रिकेट खेळत असलेली किंवा मोसमानुसार पतंग उडवण्यात दंग झालेली मुले दिसताहेत. कधी कधी संध्याकाळी पूर्वेकडील देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करुन पश्चिमेकडे जाणारे विमान दिसायचे तर कधी कधी एखादे चॉपर उडत येऊन पवनहंस हेलिपॅडवर मोठा आवाज करत उतरताना दिसायचे. आधुनिक परिवहनाची साधने मोठा आवाज करुन आपले अस्तित्व जाणवून देत असताना एखादे मूल आकाशाकडे बोट दाखवायचे तर इतर मुले त्याच्या सभोवार उभी राहून नवलाने बघत असताना दिसायची. आणि दुस-याच क्षणी ही मुले आपल्या गल्लीतल्या क्रिकेटकडे वळायची किंवा एखाद्या खाली पडलेल्या पतंगाकडे धावताना दिसायची. आपण केवळ आशाच ठेवू शकतो की, त्या नवलाईच्या क्षणात त्या मुलांचे डोळे आभाळात रोखलेले असल्यामुळे त्यांच्या मनातही महत्त्वाकांक्षा निर्माण होईल आणि पुढे जाऊन ती मुले त्यांच्या अरुंद गल्ल्या ते शेवटच्या पवनहंस हेलिपॅड दाखवायचे. - पुढे विमानाच्या उड्डाणापर्यंतचे अंतर - जाण्याची संधीही मिळवू शकतील. ही मुले असे भरारी घेऊ शकतील का ? हा त्यांचा प्रवास कसा असेल ? ती मुले कुठे पोहचतील ? मी ह्यावर काही क्षण विचार करतो पण त्यानंतर माझे लक्ष एस व्ही रोडवरच्या वाहनांच्या सातत्याने सुरु असलेल्या बँकिंगकडे जाते. प्रतिमा दोन - साधारणतः दहा वर्षांपूर्वी माझा बहुतेक कालावधी, एक डॉक्टरेट करणारा विद्यार्थी म्हणून आणि त्यानंतर पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करुन, एका भारतीय एनजीओमध्ये प्रोफेसर म्हणून घालवत होतो. माझे हे काम म्हणजे भारतातील जुळलेली नाळच होती. न्युयॉर्क किंवा लंडन मधून सुट्टीवर भारतात आल्यावर काही दिवस, मी नागरी क्षेत्रातल्या बालवाडींना भेट देत असे आणि जर प्रवासाची योजना परवानगी असल्यास, खेड्यांमधील गतिशील वाचन कार्यक्रमांसाठीच्या डिलीव्हरी केंद्रानाही भेट देत असे. ह्या भेटींमुळे माझे त्या लोकांबरोबरचे परस्पर संबंध अधिक विश्वसनीय, स्वारस्यपूर्ण व स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर मला ते वैय्यक्तिक दृष्ट्या लाभदायकही ठरले. मूळाक्षरांची प्रथमच ओळख करुन घेणारे एखादे मूल, पुस्तकाचे प्रथमच करत असलेले वाचन, खूप उत्तेजित होऊन पुस्तकांची पाने पुनः पुनः उलटणारे बसणारे मूल, किंवा स्वतः जमविलेले दगड पुनः पुनः मोजून पाहणारे व न मोजताच केवळ नजरेनेच त्याची नेमकी संख्या सांगण्याचा प्रयत्न करणारे मूल, ह्यापेक्षा अधिक प्रोत्साहित करणारी दृष्ये फारच कमी असतील. चेह-यावरील चमक, किंवा मूल वाचण्यास, मोजण्यास शिकत असताना त्याच्या चेह-यावरची ती चमक, किंवा त्याने म्हटलेले ‘आहा’ किंवा एखादे रहस्य उलगडल्यावरचे युरेका. पण ते काहीही असो - पाहणा-याला ते जादूसारखे चकित करुन जाते. अशा भेटी दिल्यानंतर परततांना आणखी काहीतरी करण्याची चेतना जागृत होते, भारताशी जोडलेली नाळ अधिक सुदृढ करावीशी वाटते आणि ही मुले भविष्यकाळात करणारे प्रवास, भरा-या आणि प्रगती ह्यासाठी, आनंदाने शिकणे हाच अत्यावश्यक पाया असल्याची जाणीव निर्माण होते. प्रतिमा तीन - सकाळच्या वेळेला, आरबीआय मधील ऑफिसमध्ये किंवा बाँबे जिमखान्यात जाण्यासाठी मी कारने जात असतो. मिलन सबवे कडे किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडणा-या उड्डाणपुलाकडे वळण्यापूर्वी मला एस व्ही रोडवर यावे लागते. वळण्याच्या थोड्या आधी, म्हणजे हनुमान मंदिर व सांताक्रुज बस डेपो येण्यापूर्वी, डाव्या फुटपाथवर नेहमीच एक आई कष्ट करत असताना दिसत असते - दिवसातल्या कोणत्याही वेळी ती बेघर आहे हे तर स्पष्टच दिसत होते. तिला दोन तरी मुले असावीत - जवळपास सारख्याच वयाची. सकाळच्या वेळेवर अवलंबून तिची कामे ठरलेली असायची. कधी कधी करारी चेह-याने ती मुलांना झोपेतून उठवताना दिसायची तर इतर दिवशी ती सहजपणे शोधून आणलेल्या पाणी पुरवठ्याच्या पाण्याने ती मुलांना आंघोळ घालायची. कधी कधी ती मुलांना शाळेचा गणवेष चढवताना दिसायची आणि नंतर पाठीवर दप्तरे घेतलेल्या मुलांबरोबर जवळच्या शाळेत पळत जाताना दिसायची. दुरुन पाहिले तर, आपल्या मुलांना उडता येऊन भरारी मारता आली पाहिजे ह्या एकाच विचारावर तिचे मन केंद्रित झाले असणार. आई म्हणून तिची भूमिका निश्चितपणे खूप मोठी असणार - पृथ्वी पेक्षाही जड काय आहे ? महाभारतातल्या ह्या यक्ष प्रश्नाला युधिष्ठिरानेही असेच उत्तर दिले होते. ही आई हे सर्व कसे शक्य करते ? पुस्तके आणि इतर साहित्याचा खर्च तिला परवडतो का ? झेपतो का ? मुले शाळेतून आल्यावर ती घरी असते का ? दिवसभरात ती कोणते काम किंवा नोकरी करते ? ती एक सूक्ष्म उद्योजक होऊ शकते का ? पण आपले मन किती चंचल असते - ट्राफिक सिग्नलला डावीकडे वळून माझी गाडी फ्लायओव्हरकडे गेली की हे प्रश्न मागे राहतात आणि गाडी रोजच्याप्रमाणेच पुलावरुन उतरायला लागते. प्रतिमा चार - एका लख्ख उजेडाच्या शनिवारी सकाळी, कच्ची-पक्की घरे असलेल्या वस्तीमध्ये घराजवळच्या जागेत, खांद्याला पिशवी लटकवलेला, एक बँक कर्मचारी प्रवेश करतो आहे. ही वस्ती अर्ध-नागरी आहे. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, 20 ते 50 वयाच्या आणि काही 50 पेक्षा अधिक वयाच्या, बहुशः साड्या नेसलेल्या महिलांची एक फौजच त्याच्याभोवती जमा होते. ह्या बँकरकडून त्या सर्वांनीच काही विशिष्ट रक्कमा कर्जाऊ घेतल्या आहेत. त्या महिला एक-एक करुन परतफेड करत आहेत. प्रत्येक व्यवहार एका रजिस्टर बुकात नोंदण्यात येत आहे. एका पीओएस म्हणजे पॉईंट ऑफ सेल स्वरुपाच्या मशीनद्वारे ते व्यवहार त्यांच्या बँक कार्डावरही स्वाईप केले जात आहेत. काही महिला पुनः कर्ज घेत आहेत तर काही जणी त्यांच्या खात्यांमधून पैसे काढत आहेत. त्या महिन्यासाठी ह्या महिला गटांसाठी नेमलेला रजिस्ट्रार, खात्यातील नोंदी काळजीपूर्वक तपासून सही करतो आहे. चला, म्हणजे आता बँकिंग तर पार पडले आणि विकास सुरु होण्यातच आहे. ह्या सगळ्या महिला त्या पैशांचे काय करतात हे ऐकण्यास मी उत्सुक आहे. त्या सर्वजणी उद्योजिका आहेत. एकीने साड्यांचा व्यापार सुरु केला आहे - शहरातून साड्या विकत घ्यायच्या आणि आपले मार्जिन ठेवून त्या आसपास विकायच्या. तिने हा उद्योग अनेक वर्षे करत राहून आता, नावारुपाला आणला आहे आणि त्या गटातील सशर्त मुदतीचे सर्वात मोठ्या रकमेचे म्हणजे एक लाख रुपयांचे कर्ज तिला मिळाले आहे. तिच्या मैत्रीणीने कर्ज घेऊन एक शिवणयंत्र घेतले आहे आणि त्या साड्यांना मॅच होणारे ब्लाऊज ती शिवून देत आहे, आणखी एकीने ब्युटी पार्लर सुरु केले आहे, तर आणखी एकीने, तिच्या पतीच्या स्टेशनरी मालाच्या दुकानातल्या वापरात नसलेल्या जागेत शीतपेयांचा एक स्टॉल उघडला आहे. दुपारच्या वेळी स्टेशनरीसाठीची गि-हाइके कमी पण बाहेर उष्णता खूप असताना त्याचा चांगला उपयोग होतो. त्यांच्या अगदी लगतच्या कार्यक्षेत्रामध्ये दिल्या जाऊ शकणा-या सेवांची कमतरताच दिसत नव्हती. ह्या महिलांनी आपण उद्योजिका होण्यामागचे कारण जाणून घेण्यास मी उत्सुक होतो. मला मिळालेले उत्तर मात्र अगदी अनपेक्षित होते - दहा पैकी नऊ बाबतीत, आपल्या मुलांना अगदी टॉपच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी किंवा राज्य स्तरीय परीक्षांमध्ये आपल्या मुलांना वरचा दर्जा मिळण्यासाठी खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये घालण्यासाठी किंवा उज्ज्वल भविष्यकाळ असलेले कॉम्पुटिंग व प्रोग्रामिंग मुलाला शिकता येण्यासाठी लागणारे अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी ह्या महिला उद्योजिका झाल्या होत्या. प्रतिमांचा कोलाज ह्या प्रतिमा माझ्या डोळ्यासमोरुन सरकत असताना मला जाणीव झाली की, ह्या प्रतिमा, वेगवेगळ्या स्वरुपांमधल्या नसून, त्यांच्यामध्ये एक जोडणी आहे - म्हणजे, सकाळी, संध्याकाळी, सुट्टीच्या दिवसात माझ्या अर्धजाणीवेमध्ये मी गोळा करत असलेल्या ह्या प्रतिमा, आणि वित्त हा माझा व्यवसाय, ह्यामध्ये एक जोडणी आहे. वित्तीय समावेशन ते मुलांचे शिक्षण - महिला उद्योजिकांसाठीचे सूक्ष्म वित्त ते त्यांच्या मुलांना शाळेत पाठविणे, आणि मुलांनीही ‘ओहो ! मीच केले’ म्हणणे, वाचण्या-मोजण्याचे क्षण आणि त्या मुलांनी असीम आकाशात व त्याही पलिकडे भरारी घेणे ह्या दरम्यान एक खूप महत्त्वाची जोडणी स्थापन झाली. वित्त मिळणे हे एखाद्या अर्थव्यवस्थेसाठी जीवनदायी असते. त्याचे समंजसपणे वाटप केल्याने संधी व विकासाची दारे उघडतात. खरे तर त्यामुळे, मुलांचे शिक्षण, आमच्या तरुणांची कौशल्ये आणि ते स्वतः त्यांचे परिवार आणि आपणही पुढे जाऊ शकतील ह्यासाठी त्यांच्या मनात स्फुल्लिंग व कल्पना निर्माण करण्यासाठी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आधार देऊन, विकासासाठीच्या अत्यंत प्राथमिक सुधारणेलाही मदत होते. अनेक कुटुंबांकडून, आर्थिक ताण-तणावांच्या बाहेर नेणारी उडी किंवा प्रवास म्हणूनच शिक्षणाकडे पाहिले जाते. काही अपवाद वगळता, एक नियम म्हणून शिक्षण म्हणजे अशा पवाहाचे एक तिकीटच आहे. आपल्या मुलांच्या भविष्याला चांगला आकार देण्यासाठी उद्योजिका होणारी आई तिचे कर्ज फेडण्यास नेहमीच राजी असते. मूल वाढत जाईल तसतशा तिच्या गरजाही वाढत जातील. तिच्या तेव्हाच्या अधिक मोठ्या लिक्विडिटीच्या गरजांसाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी पुनः कर्ज घेण्यासाठी तिचे कर्ज-रेकॉर्ड निष्कलंक असणे आवश्यक आहे. अशा रितीने ती व कर्ज देणारा ह्या दरम्यान संपूर्णपणे प्रोत्साहक अनुरुपता असते. परतफेड करण्यास राजी असण्याव्यतिरिक्त, पुढील काळातही असे शिक्षण-तिकिट घेणे सुरुच ठेवण्याच्या गरजेपोटी तिचा व्यवसाय कौशल्याने केला जाण्यामुळे तिची परतफेड करण्याची क्षमताही सुदृढ होते. त्यामुळे धनको छोट्या कर्जाने सुरुवात करुन, परतफेड करण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी कमी मुदत ठेवू शकतो आणि तिच्यासाठी एक बँक खाते उघडून देऊन त्यातून इतर प्रदानांचा मागोवा घेऊन, पत मूल्यांकन सुधारु शकतो. महिला उद्योजिका कर्जदार म्हणून जसजशी परतफेड करत राहील तसतशी तिची प्रतिमा वाढत जाईल आणि ती जास्त मुदतीची मोठ्या रकमेची कर्जे मिळवू शकेल. एखाद्या गटाचा एक भाग म्हणून कर्ज घेतले गेल्यास परतफेड करण्याचे प्रोत्साहन वाढते - इतरांनी परतफेड केली असताना एखाद्या कसुरी करणाराला तसे करणे लांच्छास्पद ठरते. ह्याच्या उलट, एखाद्याने कर्ज फेडीत कसुरी करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास, अन्यथा चांगली असलेली कर्ज संस्कृती बिघडू शकते. कर्ज देण्याबाबतचा खर्च, सुरुवातीच्या कसुरींमुळे झालेल्या तोट्यांसह, धनको, वाटून/पसरवून टाकू शकतो. कसुरीची वसुली झाल्यावर त्या उद्योजकाला कर्जाचे ‘रेशनिंग’ केले जाऊ शकते किंवा कर्जाच्या अटी अधिक कडक केल्या जाऊ शकतात किंवा मुदत कमी केली जाऊ शकते. अशा प्रकारे सूक्ष्म उद्योजकांना सूक्ष्म वित्त उपलब्ध केले जाते आणि सर्व प्रकारच्या समाजाला त्याचा लाभ होतो2 आता मी, ह्या प्रतिमांकडून माझ्या आरबीआयमधील कामांकडे आणि अधिकाधिक कर्जदारांना सूक्ष्म कर्ज उपलब्ध होण्याची, सूक्ष्म वित्तामुळे पाया भक्कम होण्याची, सूक्ष्म कर्जाला अतिरिक्त गती दिली जाण्याची आणि अप्रत्यक्षपणे ह्या प्रक्रियेत आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी व कौशल्ये आत्मसात करण्यासाठीच्या संधी दिल्या जाण्याची खात्री करण्यासाठी आम्ही कोणते प्रयत्न करत आहोत ह्याकडे वळतो. पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर) - कर्ज डेमोक्रटाइज (लोकसत्तानुवर्ती) व औपचारिक (फॉर्मलाइज) करण्यासाठीची एक महत्त्वाची पायरी3 भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेमध्ये असे समजले जाते की, अनौपचारिक अर्थव्यवस्थेखाली चालविण्यात येणा-या छोट्या उद्योजकांना पुरेसे कर्ज मिळत नाही, कारण ते उद्योजक त्यांच्या धनकोंना पारदर्शकत्वाने माहिती देत नाहीत व पारदर्शक अशा मोठ्या व्यवसायानांच कर्जे देणे धनको पसंत करत असतात. आरबीआयच्या बेसिक स्टॅटिस्टिकल रिर्टन्स मधील (बीएसआर), अनुसूचित वाणिज्य बँकांची (एस सी बी) मार्च, 2018 ची माहिती दर्शविते की, आऊटस्टॅडिंग कर्जाचा जवळजवळ अर्धा भाग हा शंभर दशलक्ष रुपयांपेक्षा अधिक टिकिट साइजसाठी आहे तर, 30 टक्के भाग हा एक बिलियन रुपयांच्या वर आहे. विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसई) हे कर्ज कमी आहे. सर्वसाधारणतः ते एक ते दहा दशलक्ष रुपये असल्याचे समजले जाते. एससीबींकडील 95 टक्के खात्यांबाबत मंजुर केलेली कर्ज मर्यादा प्रत्येकी एक दशलक्ष रुपये असली तरीही ह्या खात्यांवरील आऊटस्टँडिंग रक्कम एकून येण्याच्या 23 टक्के आहे. मी माझ्या प्रतिमांच्या कोलाजमध्ये सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म कर्जांच्या प्रगतीमुळे अर्थव्यवस्था - मूल्याचे कुलुप उघडू शकेल. ह्यासाठी आपल्या भविष्यकाळातील कर्ज अर्थ-प्रणालीचा पुनर्विचार करण्यासाठी व तिला नवा आकार देण्यासाठी आपल्यासाठी एक मोठी संधीच आहे का ? आरबीआयमधील आम्हा सर्वांचा ह्यावर विश्वास आहे. आम्ही पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर) वर काम सुरु केले आहे. सूक्ष्म उद्योजकांना कर्ज मिळविण्यामधील सतावणारी माहितीची समस्या मूलभूत प्रकारे आम्ही कशा प्रकारे सोडवू शकतो ह्याबाबत आम्ही खूप उत्तेजित आहोत. ह्या माहितीबाबतच्या समस्येवर आणि ती सोडविण्यास पीसीआर कशी मदत करते ह्यावर मी आता सविस्तरपणे सांगतो. एखादे कर्ज देतेवेळी, कर्जदाराने दिलेल्या माहितीत तफावत असणे ही कोणत्याही धनकोची मोठी अडचण असते. साध्या शब्दात सांगायचे झाले तर, कर्जदाराकडे तिची स्वतःची आर्थिक स्थिती व जोखमी ह्याबाबत धनकोंपेक्षा अधिक माहिती असते. क्रेडिट इन्फर्मेशन प्रणालींचा उद्देश म्हणजे, पूर्वीच्या कर्जदारांचा कर्ज इतिहास आणि कर्जदाराचा विद्यमान कर्जबाजारीपणा धनकोला माहित करुन ही तफावत कमी करणे. असा क्रेडिट इन्फर्मेशन प्रणालीचा उपयोग धनको, फरक जाणून घेऊन त्या कर्जाचे सुयोग्य खर्च (व्याजदर) ठरविणे, तसेच त्याबाबतच्या अटी बदलणे (परिपक्वता, तारण, कॉव्हेनॅट्स इत्यादि) ह्यासाठी करु शकत असल्याने कर्ज वाट्याची क्षमता सुधारते. क्रेडिट इन्फर्मेशन प्रणाली नसत्या तर काय होईल ? कर्जदार कर्ज घेऊन कर्ज इतिहास तयार करत असतात. धनको त्यांच्या लाभदायक ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण करण्याचीच इच्छा ठेवतात आणि ती माहिती इतर धनकोंबरोबर थेट शेअर करण्यास तयार होत नाहीत. अशा प्रकारात, कर्जदार, त्यांच्या सुरुवातीच्या धनकोंशी बांधले जातात आणि कर्जाच्या अटींचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि अधिक वाईट म्हणजे, विद्यमान धनकोंना त्याबाबत समस्या निर्माण झाल्यास, (म्हणजे, तोटा झाल्यामुळे भांडवली -हास होणे - त्यांच्या मोठ्या कॉर्पोरेट कर्जदारांच्या स्पिल ओव्हर मुळे ती कर्जे अकार्यकारी ठरल्याकारणाने, बँकांकडून फुटकळ व एमएसएमई कर्जांचे मूल्य गेल्या दशकात खूप वाढले होते), नव्या धनकोंना त्यांचा कर्ज-दर्जा समजून येत नाही. येथेच तृतीय पक्षीय क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्या येतात, ह्या कंपन्या धनकोंकडील डेटा एकत्रित करतात आणि ठरविलेल्या धोरणानुसार ती माहिती इतर धनकोंबरोबर शेअर करतात. जागतिक दृष्टीने, प्रायव्हेट क्रेडिट ब्युरोज् (पीसीबी) व पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीज् (पीसीआर) ह्या दोन्हीही संस्था ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कर्जविषयक माहिती मिळविण्यासाठी पीसीबींना कायद्याने प्राधिकृत केले जाऊ शकते, तथापि नफा मिळविणा-या असल्याने, जास्तीत जास्त नफा मिळणा-या माहिती-विभागाबाबतच त्या आपले व्यवसाय - मॉडेल तयार करण्यावरच त्या लक्ष केंद्रित करु शकतात (उदा. - गोळा केलेल्या डेटावर आधारित कर्ज दर्जा ठरविणे). खरे तर, आंतरराष्ट्रीय दृष्ट्या दिसून येते की, पीसीआर ही नफा न मिळविणारी संस्था असल्याने, ती पीसीबींपेक्षा अधिकतर माहिती गोळा करते आणि पीसीबींना, पीसीआरकडील सर्वसमावेशक माहिती दिल्यावर, त्या पीसीआर, माहितीचे विश्लेषण व नववर्णन रीती ह्यांच्याद्वारे मूल्यवर्धन करुन, पीसीबींना पूरकच ठरतात. ह्यावरुन सहज अनुमान काढता येऊ शकते की, कर्जाबाबतची संपूर्ण माहिती गोळा करणे क्रेडिट इन्फर्मेशन प्रणालींसाठी महत्त्वाचे आहे. कर्जदाराची अॅसेट बाजू व कॅश फ्लोचा तपशीलासह - ह्यालाच कधी कधी ‘360 डिग्री दृष्य ’ असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे अगदी अलिकडील माहितीही खूप महत्त्वाची असते व त्यामुळे मागणी व रियल टाईम डेटा काढता येतो. श्री. वाय एम देवस्थळी ह्यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय कृतिदलाच्या (एच टी एफ), पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री ऑफ इंडियावरील अहवालात पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर) म्हणजे काय हे वरील प्रमाणे वर्णन केले आहे. भारतामधील विद्यमान क्रेडिट इन्फर्मेशन प्रणालीमधील डेटा - अंतरांची एचटीएफने तपासणी केली, आणि क्रेडिट मार्केटची माहिती क्षमता सुधारण्यासाठी व भारतामधील कर्ज संस्कृती सुदृढ करण्यासाठी, सुयोग्य अधिनियमाद्वारे एक पीसीआरची स्थापना करण्याची शिफारस केली. भारतासाठीची पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर) कसे काम करेल ? मूलभूत (कोअर) कर्जविषयक माहितीचा एक डेटा बेस म्हणून पीसीआरकडे पाहिले जाते - म्हणजे अशा प्रकारची एक पायाभूत सुविधा की जिच्या आधारावर कर्जविषयक माहितीचे युजर्स पुढील विश्लेषण करु शकतात. ह्यात सर्व विनियामक संस्थांचा (म्हणजे धनकोंचा) हा प्रवेश टप्प्याटप्प्याने केला जाईल व त्यामुळे कर्जदारांचे 360 डिग्री दृष्य तील, म्हणजे सर्वसमावेशक दृष्य दिसू शकेल. कॉर्पोरेट फायलिंग्ज, टॅक्स प्रणाली (वस्तु व सेवा नेटवर्क किंवा जीएसटीएन सह) आणि युटिलिटी प्रदाने ह्यासह बँकिंग प्रणालीच्या बाहेर असलेल्या दुय्यम/सहाय्यक माहिती प्रणालींबरोबर जोडण्या करण्यास मदत होईल. सरकारशी सल्लामसलत करुन तयार केलेल्या सर्वसमावेशक अशा पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री अधिनियमाचा आधार व नियंत्रण पीसीआरला असणे आवश्यक आहे. ठरविण्यात आलेल्या एका सहमती साचावर आधारित अशा अत्याधुनिक गोपनीयता-मार्गदर्शक तत्वांचे पालन त्याने करणे आवश्यक आहे. प्रपोज्ड पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर) इन्फर्मेशनची आर्किटेक्चर हा पीसीआर कसे काम करील व त्यामुळे कर्ज संस्कृती कशी सशक्त होईल हे आता मी सांगतो. (1) सर्वप्रथम, कर्ज देणा-या संस्थांच्या वाढत्या व्याप्तीमुळे, पीसीआर, कर्जदारांबाबतची माहिती अधिक परिपूर्ण करील. विशेषतः, लहानातल्या लहान अशा प्राथमिक शेती-कर्ज सोसायट्यांपर्यंतही तो पोहोचेल. आरबीआयकडून विनियमित नसलेल्या संस्थांचाही त्यात समावेश असेल. मात्र, हे काम टप्प्याटप्प्याने करावे लागेल आणि ते पूर्ण होण्यासाठी तीन ते पाच वर्षे लागतील किंवा त्याहीपेक्षा आधी होऊ शकेल. (2) दुसरे म्हणजे, पीसीआरमुळे, धनकोंवरील अहवाल पाठविण्याचा भार सुलभ व खूप कमी होईल. विनियामक व पर्यवेक्षक ह्यासह इतर संस्था, पीसीआर मधून मूलभूत कर्ज माहिती मिळवून, त्यात त्यांच्या गरजेनुसार वाढीव माहिती टाकू शकतील. आरबीआयकडून सध्या गोळा करण्यात येणारे सांख्यिकी अहवाल त्यानुसार समंजस व काटछाट केले जावेत आणि त्यामुळे डेटा गोळा करण्याचे वारंवार प्रयत्न, पाठपुरावा व साफसफाई करत बसण्याऐवजी वित्तीय अर्थव्यवस्था प्रणालीमधील स्त्रोत विश्लेषणासाठी मुक्त होतील. बँकांकडून सध्या असा डेटा गोळा करणा-या इतर संस्थांच्या बाबतीतही हेच लागु असेल. (3) तिसरे म्हणजे, ह्या पीसीआरमुळे कर्ज डेटा सध्यापेक्षा अधिक उच्चतर फ्रिक्वेन्सीवर डिजिटल स्वरुपात उपलब्ध होईल. त्यामुळे, कर्ज देण्याबाबतचा निर्णय अधिक जलद व सक्षमपणे घेता येईल. (4) चौथे म्हणजे, येथे दिलेल्या कोष्टकात दिल्यानुसार, कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाकडील कॉर्पोरेट डेटा (एमसीए 21) किंवा कर देण्याबाबत किंवा इनव्हॉइसिंग डेटा (जीएसटीएन) ह्यासारख्या इतर माहिती प्रणालींशी जोडण्या केल्याने, कर्जदारांच्या मालमत्तेवरील व कॅश फ्लोवरील माहिती मिळविण्यास, युजर्सना त्याची मदत होईल आणि सक्षम असे कर्ज निर्णय घेण्यास ही माहिती अत्यावश्यक आहे. (5) आणि शेवटी, पीसीआरच्या रचनेमध्येच, गोपनीयतेचे प्रश्न सोडवणे शक्य असून, डेटाचा सुयोग्य उपयोग होण्यासाठी सहमती आधारित असे डेटा नियंत्रण मिळविणे, सध्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे ठेवता येईल. कर्जाचे सार्वजनिकीकरण करण्यासाठी पीसीआर हे फक्त एक पाऊल आहे. ह्या उद्दिष्टांसाठी वरील प्रश्नांचा समतोल राखला जाणे आवश्यक आहे. ह्यात कर्ज - माहितीचा उपयोग केवळ विनियामक/पर्यवेक्षकीय हेतूंसाठीच केला जात नसून, क्रेडिट मार्केट सक्षमतेने वाढविण्यासाठीही केला जातो. विशेषतः (अ) एखाद्या व्यक्तीला, त्याचा पीसीआर मध्ये साठविलेला डेटा मिळविता येत असला तरी; कर्ज मिळविण्यासाठी तो डेटा इतर धनकोंबरोबर शेअर करण्याचा अधिकार त्याला दिला गेला पाहिजे. (ब) त्याचप्रमाणे, अशा खात्यांवर देखरेख ठेवण्यासाठी, धनकोंना त्यांच्या स्वतःच्या ग्राहकांची संपूर्ण माहिती मिळविता यावी. (क) विनियामक/पर्यवेक्षक ह्यांना त्यांच्या कामासाठी ही संपूर्ण माहिती मिळविता आली पाहिजे. त्यामुळे सर्वसमावेशक माहितीचा लाभ घेऊन ते पध्दतशीर रितीने जोखमींचे प्रश्न सोडवू शकतील. ही आवश्यक असलेली अॅक्सेस व नियंत्रण धोरणे सुयोग्यपणे तयार करण्यासाठी, उच्च स्तरीय कृतीदलाने शिफारस केली की, एक वेगळा पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री अधिनियम (पीसीआर अधिनियम) तयार/लागु केला जावा. ह्या पीसीआर अधिनियमाद्वारे, माहिती सुरक्षित ठेवून त्याच वेळी, कर्जाचे कार्यक्षम वाटप व विनियामक पर्यवेक्षण करण्यास आणि कर्जविषयक माहिती शेअर करण्याबाबत प्रतिबंध करणारे विद्यमान निर्बंधही सोडविले गेले पाहिजेत. त्याचप्रमाणे, आरबीआयच्या थेट विनियमांखाली नसलेल्या धनको-संस्थांकडूनही माहिती आणण्याइतका हा पीसीआर अधिनियम सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. ह्याबाबत, येत्या काही महिन्यांमध्ये, सरकार व इतर विनियामकांबरोबर आरबीआय विचार विनिमय करणार आहे. दरम्यानच्या काळात, आरबीआयने एक अंमलबजावणी कृतीदल तयार केले असून, ते कृतीदल, विद्यमान वैधानिक साचाखालील किंवा थोडा बदल करुन विनियामक संस्थांकडून माहिती गोळा करुन, पीसीआर सुरु/लागु करण्यासाठी पायाभूत सोयी-प्रणाली तयार करत आहे. पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीमुळे, सूक्ष्म कर्ज, एका ‘छोट्या पिशवीत’ (सॅशे) आणणे शक्य व्यक्ती व छोटी कर्जे ह्यासाठी कर्जाची मॉडेल्स तयार करण्यासाठी, धनको आणि कर्ज-मॉडेल तयार करणारांना, सूक्ष्म कर्जदारांसाठीचे केवळ आऊटस्टॅडिंग कर्जच माहित असणे हेच आवश्यक नाही, तर त्यांचा संपूर्ण परतफेड-इतिहास व त्यांच्या कॅश फ्लो मधील चढउतार देखील, कर्जाबाबतच्या अटी ठरविण्यास माहित असणे आवश्यक आहे. अशा माहितीच्या अद्यावत, धनकोंना संपूर्ण माहिती न मिळाल्यामुळे, अनेक कर्जदारांना, कर्ज बाजारातून केवळ ‘रेशनिंग’च मिळेल. प्रत्येक कर्ज व्यवहाराचा मागोवा, पीसीआरकडून अगदी सुरुवातीपासून ते कर्ज संपेपर्यंत (सुरुवातीच्या अटी, परतफेड, कसुरी, पुनर्रचना इत्यादि) घेत असल्याने, आणि ठेवण्यात आलेल्या निरनिराळ्या डिजिटल प्रणालींशी त्याची जोडणी असल्यामुळे (वरील तक्त्यात दाखविल्यानुसार), चांगले उद्योग, सूक्ष्म उद्योग आणि सूक्ष्म उद्योजकही त्यामुळे ओळखले व जाणले जाऊ शकतात. दुस-या शब्दात, पीसीआरद्वारे नसलेला दुवा उपलब्ध केला जाईल - म्हणजेच कर्जदाराच्या किंवा भावी कर्जदाराच्या माहितीचे 360 डिग्री दृष्य, कर्जदाराच्या कॅश फ्लोजची सफलक्षमता नजरेसमोर ठेवून, त्याला संबंधित प्रश्न विचारुन (उदा. - त्या सूक्ष्म उद्योगामधून भरपूर कॅश फ्लोज येत असूनही, कर्ज फेड करण्यात अडथळे आणणारे इतर काही प्रश्न आहेत का ? ), त्या कर्जदाराच्या कर्ज-जोखमींचे मूल्यमापन करण्यास आणि कर्ज देण्याबाबतच्या ड्यु डिलिजन्समध्ये तडजोड न करता, कर्जाच्या अटी ठरविण्यास ह्यामुळे धनकोंना मदत होईल. ह्यावर आधारित, फिन-टेक कंपन्यांनी प्रयत्न केल्याप्रमाणे जवळ जवळ स्वयंचलित अशा कर्ज-मंजुरी व वाटप यंत्रणा तयार करता येऊ शकतील. खरे पाहिले तर, कर्ज उत्पादांचे, छोट्या रकमेची कर्जे व लघु परिपक्वतेची आणि शून्य किंवा अल्प तारण आवश्यकतांची कर्जे मंजुर करुन रुपांतरण केले जाऊ शकते. अशी माहिती निर्माण करणारी सुरुवातीची कर्जे फेडून कर्जदार व उद्योजक त्यांची प्रतिमा व कर्ज दर्जा निर्माण करु शकतात. हळूहळू ते जास्त रकमेचे व जास्त मुदतीचे कर्ज घेऊ शकतात आणि संभवतः उत्पादकता वाढविण्यासाठी भांडवली गुंतवणुक करु शकतात. एकदा त्यांचा व्यवसाय वाढला व त्यांनी जीएसटीएनमध्ये पंजीकरण केले की, इनव्हॉईजस द्वारे कॅश फ्लो ची पडताळणी पीसीआर बरोबर करता येते. काही काळानंतर, एक चांगला कर्ज इतिहास निर्माण होणे हे एक सशक्त तारण तयार करण्यासारखेच असून त्यामुळे धनकोंचा विश्वास मिळविता येतो. कर्जाचे असे सॅशेटायझेशन सध्या तरी औपचारिक क्रेडिट मार्केटमध्ये समाविष्ट नसले तरी, ह्या सूक्ष्म व लघु उद्योगांना, कर्ज मिळविण्यासाठी अधिकाधिक प्रसार करील. सूक्ष्म उद्योजकांची परतफेड करण्याची क्षमता व त्यासाठी त्यांनी राजी असणे ह्याबाबत सांगितल्यानुसार, कर्जदारांनी परतफेड न करणेच सुलभ करुन त्यांच्यामधील अंगभूत अशा सशक्त कर्ज संस्कृतीला कमी न लेखणे महत्वाचे आहे. त्यामुळे इतरांपेक्षा वेगळा असा प्रतिष्ठित कर्ज इतिहास सूक्ष्म उद्योजक कसा निर्माण करतात व कालांतराने, आकाराने व आर्थिक मूल्य निर्मिती करण्यात ते कसे वृद्धिंगत होतात ह्याच्या मूलभूत तत्वांशीच तडजोड केल्यासारखे होईल. मी आता ह्या भाषणाचा समारोप करतो. मी सुरुवातीला सांगितलेल्या प्रतिमा, माझ्या मनातील त्यांचा कोलाज आणि आरबीआयमधील माझे काम ह्या सर्वांच्या दरम्यान एक घट्ट जोडणी आहे. शेवटी, सामान्य माणसाला केंद्रीय बँका नेहमीच दिसत नसल्या तरीही, त्यांनी तयार केलेली धोरणे तिच्या मनाला एका अर्थपूर्ण रितीने स्पर्श करत असतात. तिच्या व्याप्तीनुसार अर्थव्यवस्थेने शेवटी हेच साध्य करण्यास मदत केली पाहिजे. घराचे अधिक चांगले व्यवस्थापन पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री सारख्या वित्तीय माहिती पायाभूत सोयीमुळे, सूक्ष्म कर्ज मिळविण्यात, तसेच आपली मुले व तरुण ह्यांनी शालेय शिक्षण व कौशल्ये आत्मसात करण्यात सुधारणा हे भविष्यकाळात दिसू शकणारे दृष्य असे म्हणजे जरा धाडसाचे असू शकेल - पण प्रत्यक्षात ते होवो. माझ्या मुलाच्या शाळेत गेल्या वर्षी लावलेल्या एका पोस्टरमुळे माझी, मायकेल अँजेलोच्या एका सुंदर विचाराशी ओळख झाली. आणि त्यामुळे आपण अशी चित्रे का रंगवत रहायचे आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी का प्रयत्न करत रहावयाचे हे अधोरेखित होते. तो सुविचार म्हणजे - ‘आपल्यापैकी बहुतेकांसाठी सर्वात मोठा धोका उच्च ध्येय ठेवून स्वतः कमी पडण्यात नाही, तर तो खूप खालचे ध्येय ठेवून ते साध्य करणे हा आहे.’ 1हे माझे विचार मी, मुंबईमधील फेलोशिप शाळेतील माझे आवडते शिक्षक शैलेश शहा सर त्यांना अर्पण करत आहे. ते जानेवारी 5, 2019 रोजी सकाळी देवाघरी गेले. त्यांनी मला भारतीय भाषा, सोशल सायन्सेस आणि निबंधात्मक लेखन शिकविले होते. त्यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये महत्वाकांक्षा जागृत केली होती आणि आमच्यामध्ये कल्पनांचे स्फुल्लिंग निर्माण केले होते. ह्या विचारांचा काही भाग एका पुस्तकासाठी 2017 मध्ये तयार करण्यात आला होता आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अनेक मेळाव्यात व काही दीक्षान्त समारंभात भाषणातून सांगण्यात आला होता. ही अंतिम आवृत्ती म्हणजे अशा भाषणांमधून मी केलेली निरीक्षणे असून, ती डिसेंबर 15, 2018 रोजी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटीबी) ह्यांच्या टेक फेस्टमध्ये भाषणाच्या स्वरुपात देण्यात आली. अनुजित मित्रा, जोस कत्तुर व विनीत श्रीवास्तव ह्यांनी दिलेल्या अमोल सूचनांसाठी मी त्यांचा ऋणी आहे. 2काही विद्यार्थी मेळावे व दीक्षान्त समारंभांमध्ये मी ह्या भाषणाचा शेवट युवराज गलाडा ह्यांनी डिसेंबर 22, 2017 रोजी मला दिलेल्या, ओरियाह माऊंटन ड्रीमर ह्यांनी 1999 मध्ये लिहिलेल्या ‘दि इनव्हिटेशन’ नावाच्या कवितेने केला आहे. ह्या कवितेने मला खूप मोठी प्रेरणा दिली. 3ह्या विषयावरील अधिक माहितीसाठी ऑगस्ट 2018 मध्ये मी दिलेले भाषण - ‘पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर) अँड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स नेटवर्क (जीएसटीएन): जायन्ट स्ट्राईड टु डेमॉक्रॅटाईज अँड फॉर्मलाईझ क्रेडिट इन इंडिया’ पहावे. |