सिटीझन्स कॉर्नर - आरबीआय - Reserve Bank of India
विहंगावलोकन
भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व बँकेच्या, तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या या प्रयत्नात तुमचे स्वागत असो. देशाची मध्यवर्ती बँक या नात्याने आम्ही तुमच्या पैशाचे मूल्य अबाधित ठेवण्याचे अनेक रीतींनी प्रयत्न करीत आहोत आणि तुमचा कष्टाचा पैसा सुरक्षित कसा ठेवावा याबद्दलची माहिती तुम्हाला देणे हा देखील या प्रयत्नांचाच एक भाग आहे
तुमच्यापर्यंत पोहचण्याचा एक मार्ग म्ह्णजे ही वेबसाईट आणि तिच्या माध्यमातून, तुम्हाला उपयुक्त असलेली माहिती तुमच्याच भाषेतून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सुरुवातीला भारतीय रिझर्व बँकेची भूमिका आणि कार्ये, तसेच भारताच्या या मध्यवर्ती बँकेशी तुमचा सबंध कसा काय येतो याबद्दल तुम्ही वाचाल. त्याचबरोबर, तुम्हाला तुमच्या बँकेशी जोडणारे आरबीआय विनियमही तुम्ही वाचाल. तुम्ही प्रश्न विचारु शकता, तुम्हाला असलेल्या शंकांचे निरसन करुन घेऊ शकता आणि इतकेच नव्हे तर, तुमची बँक किंवा आर बी आय चे कार्यालय किंवा विभाग देत असलेल्या सेवेतील न्यूनतेबद्दल तक्रारही दाखल करु शकता. आम्ही तुम्हाला येथे द्रव्य, बँकव्यवहार आणि अर्थसहाय्य याबद्दल काही कुतुहलजनक तर काही उपयुक्त अशी माहिती देत आहोत. कारण......
.....आमचा विश्वास आहे की, सामान्य माणसाला अधिकार/सार्मथ्य देणे हाच संपत्ति जोपासण्याचा सुरक्षित असा मार्ग आहे.