नो यू बँकनोट्सवर एसएमएस - आरबीआय - Reserve Bank of India
एसएमएस – नाणे
1. रु.10 ची नाणी ही प्रतीकासहित आणि प्रतीकारहित अशा दोन्ही स्वरूपात जारी करण्यात आली आहेत. दोन्ही वैध आहेत. तेव्हा ती निर्धास्तपणे स्वीकारा. अधिक जाणून घेण्यासाठी आरबीआयला 14440 वर मिस्ड कॉल द्या.
2. रु.10 ची नाणी 10 आणि 15 अशा दोन्ही रेडिएटिंग लाइन्ससह जारी करण्यात आली आहेत. दोन्ही वैध आहेत. अधिक माहितीसाठी आरबीआयला 14440 वर मिस्ड कॉल द्या.
ओबीडी – नाणे
आरबीआयला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. दैनंदिन व्यवहारांमध्ये मिळणारी दहा रुपयांची नाणी कृपया विनाखळखळ स्वीकारा आणि त्यांच्या संबंधीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका.
रिझर्व बँक ऑफ इंडिया भारत सरकारच्या टाकसाळीतून पाडलेली नाणी चलनामध्ये ठेवते. ही नाणी वेळोवेळी सादर केली जातात आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची विविध विषयसूत्रे ह्यांची वैशिष्ट्ये व डिझाइन्समधून सुस्पष्टपणे प्रतिबिंबित होतात. नाणी ही दीर्घकाळपर्यंत चलनात राहत असल्यामुळे बाजारात एकाच वेळी वेगवेगळ्या डिझाइन्सची आणि आकाराची नाणी उपलब्ध असण्याची बरीच शक्यता असते. उदाहरणार्थ, 10 रुपयांच्या नाण्यांचे 2 ठळक वेगळे प्रकार दिसतात – एकामध्ये रेडिएटिंग लाइन्सच्या नमुन्यामध्ये रुपयाचे प्रतीक आहे तर दुसऱ्यामध्ये रुपयाचे प्रतीक नाही. अशी देखील नाणी आहेत , जी प्रसंग किंवा व्यक्तींच्या स्मरणासाठी जारी करण्यात आली आहेत. ती जरी वेगळी दिसली तरी ती सगळी कायदेशीर निविदा आहेत आणि व्यवहारांसाठी योग्य आहेत. अधिक माहितीसाठी , कृपया rbi.org.in.rbi.org.inवर उपलब्ध असलेले वृत्तपत्रीय वार्तांकन बघा.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा