तुमचे बँकनोट्स जाणून घ्या - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा


आढावा
- करन्सी नोटांमध्ये देशाची संपन्न आणि वैविध्यसमृद्ध संस्कृती, त्याचा स्वातंत्र्य लढा आणि देश म्हणून संपादित केलेल्या अभिमानास्पद गोष्टी प्रतिबिंबित होतात .
- देशाच्या सांस्कृतिक वारशाची सुस्पष्ट ओळख करून देण्याच्या दृष्टीने तसेच विज्ञानातील त्याच्या प्रगतीचे दर्शन घडवण्यासाठी , नोटांची नवीन डिझाइनमधील एक नवीन मालिका सादर करण्यात आली आहे.
- ह्या नवीन डिझाइनच्या बँक नोटा रंग , आकार आणि विषयसूत्र ह्याबातीत प्रचलित महात्मा गांधी बँक नोटांच्या मालिकेपेक्षा ठळकपणे वेगळ्या आहेत.नोटांच्या नवीन मालिकेचे विषयसूत्र भारताच्या वारशाचे दर्शन घडवणारी स्थळे हे आहे.
- ह्या नोटांमध्ये देवनागरीतील संख्या आणि ‘स्वच्छ भारत’चा लोगो, ह्या नवीन अन्य घटकांची भर घालण्यात आली आहे. तसेच नवीन नोटांच्या डिझाइनच्या घटकांमध्ये बहुलता आणि जटिल आकार व आकृतींचा अंतर्भाव आहे.
- प्रचलित बँक नोटांच्या मालिकेतील सुरक्षा वैशिष्ट्ये , जसे की वॉटरमार्क, सुरक्षा धागा , मूल्यवर्गीय संख्यांची गुप्त प्रतिमा, रंग बदलणाऱ्या शाईतील मूल्यवर्गीय संख्या पॅनेल्स,अंक पॅनेल्स , सी थ्रू रजिस्टर, इलेक्ट्रो टाइप, ब्लीड लाइन्स, वगैरे तशीच ठेवण्यात आली असून नवीन डिझाइनच्या नोटांमध्ये त्यांच्या संबंधित जागा बदलण्यात आलेल्या असू शकतात.
बँकनोट्स
मोठ्या स्वरूपात आणि तपशीलवार बघण्यासाठी कृपया नोटांवर क्लिक करा.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
हे पेज उपयुक्त होते का?