फसवणूक ईमेल, कॉल आणि एसएमएस - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा
आढावा
मोठ्या पैशांचे आमिष दाखवणारे अनाहूत ई-मेल्स, कॉल्स आणि संदेश हे खोटे असतात. तुमचे मेहेनतीचे पैसे धोक्यात घालू नका.
- आरबीआय/ आरबीआयचे पदाधिकारी आणि / किंवा तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे हे सांगणारे कुणीही प्राधिकारी ह्यांच्या नावे आलेला एसएमएस , फोन,ईमेलने फसवले जाऊ नका.
- ज्ञात किंवा अज्ञात संस्थांकडून मोठी रक्कम मिळण्यासाठी प्रारंभिक ठेव , कमिशन किंवा हस्तांतरण शुल्क म्हणून पैसे पाठवू नका
- आरबीआय व्यक्तीचे खाते उघडत नाही, तसेच क्रेडिट किंवा डेबिट कार्ड देत नाही.
- तुमच्या बँक खात्याचे तपशील, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी , पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर , सीव्हीव्ही , एटीएम पिन किंवा ओटीपी कुणालाही उघड करू नका. आरबीआय किंवा तुमची बँक हे कधीही मागणार नाही.
- एसएमएस / ईमेल मार्गे आलेल्या लिंक्स क्लिक करून तुमच्या बँक खात्याचे तपशील देऊ नका. फक्त तुमच्या बँकेच्या अधिकृत साइटवर किंवा तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या मागच्या बाजूला दिलेल्या माहितीवरच भरवसा ठेवा
- तुम्हाला जर परदेशातून किंवा भारतातून कुठूनही स्वस्त निधीचे कोणतेही प्रस्ताव आले तर तुम्ही स्थानिक पोलिस , सायबर गुन्हे प्राधिकारी किंवा sachet@rbi.org.in वर तक्रार दाखल करा.
*जेव्हा एखादा व्यवहार तुम्ही सुरू करता तो वगळून
For More Information
For More Information
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
डिजिटल बँकिंगमध्ये बदला
तुमची करन्सी जाणून घ्या
बँक स्मार्टर
हे पेज उपयुक्त होते का?