फसवणूक ईमेल, कॉल आणि ईमेलवर एसएमएस - आरबीआय - Reserve Bank of India
आरबीआय सावधतेच्या इशाऱ्यांवर एसएमएस
1. बक्षीस स्वरुपात मोठा धनलाभ व्हायच्या आशेने शुल्के किंवा आकार भरू नका. आरबीआय/ आरबीआय गव्हर्नर/ सरकार असे ईमेल/ एसएमएस / कॉल कधीही पाठवत नाही. अधिक माहितीसाठी, 8691960000 वर मिस्ड कॉल द्या.
2. तुम्हाला जर आरबीआय/सरकारी संस्थेकडून लॉटरी जिंकल्याच्या किंवा चीप फंड्स मिळाल्याचे प्रस्ताव आले तर https://sachet.rbi.org.in/Complaints/Addवर तक्रार करा
आरबीआय सावधतेच्या इशाऱ्यांवर ओबीडी
फसवणूक करणारे तुम्हाला गंडवण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन पद्धती शोधत असतात.कधी ते तुम्हाला लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी रिझर्व बँकेमध्ये काही पैसे जमा करायला सांगतील तर कधी तुमच्यासाठी आलेले एखादे सामान सोडवण्यासाठी कस्टम्स ड्यूटी भरायला सांगतील. तुम्हाला जर असे प्रस्ताव आले तर स्थानिक पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रँचकडे किंवा sachet.rbi.org.in. वर तक्रार करा.
आणि ऐका आरबीआय काय सांगते
- आरबीआय व्यक्तींची खाती उघडत नाही. त्यामुळे रिझर्व बँकेकडे कोणतीही रक्कम जमा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अज्ञात व्यक्तीकडून आलेला एसएमएस, कॉल किंवा ईमेलने दिशाभूल होऊ देऊ नका आणि कोणत्याही बँक खात्यात पैसे स्थानांतरित करू नका.
- तुमच्या बँक खात्याचे तपशील सीवीवी, ओटीपी किंवा पिन कुणालाही देऊ नका. रिझर्व बँक तर विसराच, परंतु तुम्हाला तुमची बँकही असे तपशील एसएमएस, फोन किंवा ईमेलवर मागणार नाही.
अधिक माहितीसाठी आरबीआयच्या rbi.org.in वरील सावधतेच्या इशाऱ्यांवर विजिट करा.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा