कोणत्याही किमान बॅलन्सशिवाय बीएसबीडी अकाउंट - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा


आढावा
आपले बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खाते उघडा. किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही. फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड किंवा फॉर्म क्र. 60 द्वारा सहजपणे खाते उघडण्याची सुविधा मिळवा.
- बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खाते कोणीही व्यक्ति उघडू शकते. यामध्ये वय आणि उत्पन्नाचा काहीही संबंध नाही.
- बीएसबीडी खाते कोणत्याही प्रारंभिक ठेवी शिवाय उघडता येते. यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही.
- ग्राहकाच्या विनंतीवरून सामान्य बचत खाते बीएसबीडी खात्यामध्ये बदलले जाऊ शकते.
- बीएसबीडी खातेधारकांना एटीएम -कम -डेबिट कार्ड सारख्या बँकिंग सुविधा विनाशुल्क दिल्या जातील.
- बीएसबीडी खात्यामध्ये रक्कम कितीही वेळा जमा केली जाऊ शकते.
- बीएसबीडी खातेधारक दर महिन्याला जास्तीत जास्त चार वेळा विनाशुल्क पैसे काढू शकतात, ज्यामध्ये एटीएम मधून पैसे काढणे, आरटीजीएस/ एनईएफटी/ क्लीयरिंग/ इंटरनेट डेबिट्स/ स्थायी सूचना/ ईएमआयज इ. द्वारा हस्तांतरणाचा समावेश आहे.
- बीएसबीडी खातेधारक त्याच बँकेच नेहेमीचे बचत खाते उघडू शकत नाही.
अधिक माहितीसाठी
अधिक माहितीसाठी
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
बँक स्मार्टर
तुमची करन्सी जाणून घ्या
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 19, 2024
हे पेज उपयुक्त होते का?