वरिष्ठ नागरिकांसाठी सुविधांवर आयव्हीआर - आरबीआय - Reserve Bank of India
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधांवर IVRS
तुम्हाला माहित आहे का तुमचे वय जर ७० पेक्षा अधिक असेल तर तुम्ही विशिष्ट मूलभूत बँकिंग व्यवहार तुमच्या घरूनच करू शकता.बँक तुमच्या घरूनच कॅश किंवा चेक उचलण्याची व्यवस्था करील, ज्याची तुम्हाला पोचपावती दिली जाईल. तसेच तुमच्या अकाउंटमधून काढलेली कॅश किंवा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला घरपोच करण्यात येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्ही तुमचे KYC दस्तावेज आणि हयातीचे प्रमाणपत्र देखील घरबसल्या दाखल करू शकता. बँक, ह्या सेवेसाठी तिच्या बोर्डाने संमत केलेल्या धोरणानुसार तुम्हाला शुल्क आकारू शकेल; तथापि, ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट अन्य सुविधा विनाशुल्क पुरवण्यासाठीही बँकांना सांगण्यात आले आहे. बँकिंग सुविधांच्या बाबतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरबीआयने दिलेल्या सूचनांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी www.rbi.org.in/seniorcitizens ला विजिट करा.
ऑडिओ
ज्येष्ठ नागरिकांवरील एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा (हिंदी भाषा)
ज्येष्ठ नागरिकांवरील एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा (इंग्रजी भाषा)
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा