सुरक्षित डिजिटल बँकिंगवर एसएमएस - आरबीआय - Reserve Bank of India
सुरक्षित डिजिटल बँकिंग संबंधी एसएमएस
ऑनलाईन बँकिंग? फक्त https: असलेल्या साईटचा उपयोग करा, मोफत नेटवर्कवर बँकेचे व्यवहार करणे टाळा, पासवर्ड/ पिन नियमित बदला आणि तो कोणालाही देऊ नका. अधिक माहितीसाठी १४४४० वर मिस्ड कॉल द्या.

सुरक्षित डिजिटल बँकिंग संबंधी आयव्हीआरएस
तात्काळ अलर्टस मिळवण्यासाठी तुमच्या बँकेकडे तुमचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेलची नोंदणी करा. तुम्ही न केलेल्या किंवा तुम्ही अधिकृत न केलेल्या व्यवहारासंबंधी तुम्हाला अलर्ट मिळाल्यास, ताबडतोब तुमच्या बँकेची संपर्क साधून त्यासंबंधी तुम्ही कार्यवाही करू शकता. बँकेचे ऑनलाइन व्यवहार करताना तुम्हाला थोडी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. उदाहरणार्थ तुमचा मोबाईल, ई-मेल किंवा वॅलेटमध्ये बँकेसंबंधी महत्वाची माहिती साठवून ठेवू नका. बँकेचे व्यवहार करण्यासाठी फक्त सत्यापित, सुरक्षित आणि विश्वासार्ह वेबसाईटसचा म्हणजे https: ने सुरू होणाऱ्या वेबसाईटचा उपयोग करा. सार्वजनिक, खुल्या किंवा मोफत नेटवर्कमध्ये बँकेचे व्यवहार करणे टाळा. तुमचा ऑनलाइन बँकेचा पासवर्ड आणि पिन बदला. तुमचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास ते ताबडतोब ब्लॉक करा.
ऑडिओ
सुरक्षित डिजीटल बँकिंग संबंधी एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा(हिंदी भाषा)
सुरक्षित डिजीटल बँकिंग संबंधी एसएमएस ऐकण्यासाठी क्लिक करा (इंग्रजी भाषा)
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा